sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी क्रांती संभाजीनगरच्या चौकात जल्लोष च्या

दोन्ही गट समोरासमोर आल्याने काही वेळ येथे तणावाची स्थिती होती. पोलिसांनी क्रांती चौकात मोठा फौजफाटा तैनात केला होता.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात जल्लोष केला तर दुसरीकडे याचा निषेध करत ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निकालाचा निषेध करत घोषणाबाजी केली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने काही वेळ येथे तणावाची स्थिती होती. पोलिसांनी क्रांती चौकात मोठा फौजफाटा तैनात केला होता.

शिवसेना शिंदे गटाची असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते क्रांती चौकात जमले होते. त्यांनी निर्णयाचा जल्लोष करत फटाके फोडले तर दुसरीकडे निर्णयाचा निषेध करत युवा सेनेचे ऋषिकेश खैरे आणि पदाधिकारी क्रांती चौकाकडे आले.

मात्र, पोलिसांनी त्यांना रस्त्यात अडविले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी होत असल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनी ऋषिकेश खैरेंसह कार्यकर्त्यांना वाहनात बसविले तर दुसरीकडे घोषणाबाजी करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनाही वाहनात बसविण्यात आले. त्यामुळे येथील तणाव निवळला.

नोटीस देऊन सोडले

पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत क्रांती चौक पोलिस ठाण्यात नेले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष हनुमान शिंदे, हृषिकेश खैरे, सागर खार्गे पाटील यांच्यासह इतरांना नोटीस देऊन सोडल्याची माहिती पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT