Bus Fire Sakal
छत्रपती संभाजीनगर

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर धावत्या एसटी बसला आग

नाशिक वरून हिंगोलीला निघालेल्या धावत्या एसटी बसने समोरून अचानक पेट घेतला.

जमील पठाण

नाशिक वरून हिंगोलीला निघालेल्या धावत्या एसटी बसने समोरून अचानक पेट घेतला.

कायगाव (जि. औरंगाबाद) - नाशिक वरून हिंगोलीला निघालेल्या धावत्या एसटी बसने समोरून अचानक पेट घेतला. चालक वाहकांनी प्रसंगावाधान राखून बस रस्ता बाजूला उभी केली. दैव बलवत्तर म्हणून 25 प्रवाशी थोडक्यात बचावले. मात्र आगीत बस जळून खाक झाल्याची घटना अहमदनगर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गा वरील ढोरेगाव (ता. गंगापूर) परिसरात सोमवारी( ता.22) रोजी मध्यरात्री साडे बारा ते एक दीड च्या दरम्यान घडली.

गंगापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार

नाशिक आगाराची निमआराम बस एम. एच. 14 बि. टी.3805 नाशिक बसस्थानक येथून रात्री नऊ वाजता 25 प्रवासी घेऊन औरंगाबाद मार्गे हिंगोलीला जात होती. ढोरेगावापासून पुढे काही अंतरावर पेंडापुर फाट्यावर आल्यानंतर गाडीच्या इंजिन खाली धूर येत असल्याचे बस चालक रामेश्वर लोखंडे वय (40) वर्ष यांच्या लक्षात आले.त्यांनी रस्ता बाजूला बस थाबवून प्रवाशांना सामानासह खाली उतरून घेतले. वाहक मुकुंद नारळे वय (51) वर्ष यांनी संबंधित विभागाला माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री चौरे, पोलीस हेडकांन्स्टेबल अमीत पाटील, राहुल वडमारे, श्रीकांत बर्डे, रिजवान शेख, रवी लोदवाल, पदम जाधव, आदींनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना सुरक्षित स्थळी हालवले. व अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

मध्यरात्री साडे बारा ते एक वाजताची वेळ असल्याने लवकर मदत मिळाली नाही. वेळेत मदत न मिळाल्यानं बस जळून राख झाली. त्यानंतर एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर आगारप्रमुख मनिष जवळीकर, शेळके यांनी बस मधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसुन पाठवुन दिले. सकाळी गंगापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार गणेश काथार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

बस संपूर्णपणे जळाली असून अंदाजे 15 ते 18 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघाताची नोंद गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

चालक आणि वाहकाचा सत्कार

घटनास्थळी एस टी महामंडळचे उप महाव्यवस्थापक श्री. मैनद, प्रादेशिक अभियंता श्री. पाटील, औरंगाबाद विभागाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, यंत्र अभियंता किशोर सोमवंशी, सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री धनगड, गंगापूर आगाराचे आगार व्यवस्थापक मनीष जवळीकर यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रसंगावधान दाखवत 25 प्रवाशांचे जीव वाचवल्याबद्दल चालक रामेश्वर लोखंडे, वाहक मुकुंद नारळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT