plasma therpi 05.jpg 
छत्रपती संभाजीनगर

राज्यसरकारचा नवा आदेश : कोरोना चाचणीचे दर झाले कमी, आता लागणार फक्त..

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोनाबाधितांना दिलासा देण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचणीच्या दरात कपात केली आहे. नव्या आदेशानुसार एखाद्याने थेट प्रयोगशाळेत जाऊन स्वॅब दिल्यास १९०० ऐवजी १२०० रुपये आकारले जातील तर रूग्णालयात येऊन प्रयोगशाळेने रुग्णाचा स्वॅब नेल्यास २२०० ऐवजी १६०० रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
कोरोनाबाधित रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून लूट केली जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे शासनाने प्रत्येक बाबींचे दर निश्‍चित करून दिले आहेत. सुरुवातीला आरटीपीसीआर चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांकडून ४५०० रुपये शुल्क आकारले जात होते. त्यानंतर हे दर कमी करण्याची मागणी अनेकांनी शासनाकडे केली व शासनाने भारतीय आयुर्विज्ञान संस्था व एनएबीएल मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांकडून आरटीपीसीआर चाचणीचे दर निश्‍चित करण्यासाठी समिती गठीत केली.

या समितीने चाचणीचे दर ३२०० रुपयांवर आणले होते. या आदेशानंतर सात ऑगस्टला पुन्हा आणखी एक निर्णय घेण्यात आला. रुग्णाने स्वतः प्रयोगशाळेत जाऊन स्वॅब दिल्यास १९०० रुपये, रुग्णालयातून स्वॅब नेल्यास २२०० रुपये व रुग्णाच्या घरी येऊन स्वॅब नेल्यास २५०० रुपये असे दर निश्‍चित करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२००, १६०० व २००० असे सुधारित दर आरटीपीसीआर चाचणीसाठी शासनाने निश्‍चित केले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी हे आदेश काढले आहेत. 
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुधारित दर 
प्रयोगशाळेने जाऊन स्वॅब दिल्यास - १२०० रुपये. 
प्रयोगशाळेने स्वॅब नेल्यास - १६०० रुपये 
प्रयोगशाळेने रुग्णांच्या घरी जाऊन स्वॅब नेल्यास - २००० रुपये. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT