sambhaji nagar
sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : ‘मम्मी-पप्पा माफ करा' म्हणत विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

कायगाव : मम्मी-पप्पा माफ करा असे वहीवर लिहीत एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी (ता.२९) सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामगाव (ता.गंगापूर) येथील घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ओमकार दत्तात्रेय पाठे (वय १४) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. जामगाव येथील एका खासगी शाळेच्या इयत्ता ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या ओमकारने २९ डिसेंबर रोजी स्वतःच्या घरात ४ ते ७ वाजेदरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने वहीवर लिहिले की, धोका म्हणून मी चाललो. मम्मी पप्पा मला माफ करा. मी शेवटपर्यंत तुम्हाला साथ देवू शकलो. पण तुम्ही टेंशन नका घेऊ मी कायम तुमच्या सोबत राहीन, असे मजकूर लिहून घरातील पंख्याला दोरीने गळफास घेतला.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ओमकार यास खाली उतरवून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी साजिद शेख यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. ओमकार याने आत्महत्या का केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शनिवारी (ता.३०) रोजी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून त्यानंतर जामगाव येथे अंत्यविधी करण्यात आला.

ओमकार एकुलता एक मुलगा

या विद्यार्थ्याने गळफास घेतला. त्यावेळी घरी कुणीही नव्हते. तो आई, वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेने गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शकील शेख हे करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT