yashwantrao_chavan_maharashtra_open_university_ycmou_ycmou_nasik
yashwantrao_chavan_maharashtra_open_university_ycmou_ycmou_nasik 
छत्रपती संभाजीनगर

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उद्यापासून ऑनलाइन परीक्षा

संदीप लांडगे

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २०१९-२० या अंतिम वर्षाची परीक्षा यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन होणार आहेत. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उद्या सोमवारपासून (ता.पाच) या परीक्षा दोन सत्रांत सुरू होत आहेत. सकाळच्या सत्रातील पेपर सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत असेल तर दुपारच्या सत्रातील पेपर दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत असेल. हा कालावधी काही संभाव्य तांत्रिक अडचणींमुळे करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी त्यांचा पीआरएन क्रमांक आणि प्रवेश घेते वेळेस नोंदणी केलेली जन्मतारीख किंवा आईचे नाव वापरुन ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेशीत होणे गरजेचे आहे. परीक्षा देण्यासाठी सत्र सुरु होताना लॉगीन करण्यापासून परीक्षेतील ५० पैकी ३० बहुपर्यायी प्रश्न कसे सोडवायचे, योग्य उत्तर कसे नोंद करावे या सर्व सूचना लक्षात घ्यावा, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. एकूण प्रत्येक पेपरची परीक्षा ही ६० गुणांची असणार आहे.

सोमवापासून (ता.पाच) शालेय व्यवस्थापन पदविका, बी.एड, एम. ए. एज्युकेशन या सर्व विषयांचे पेपर सुरु होतील. एम.ए. हिंदी, इंग्रजीचे पेपर हे ता.७ ऑक्टोबरपासून होतील. बी.ए. पदवीचे पेपर १३ ऑक्टोबरपासून होतील. तसेच विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देता यावी. यासाठी युझर मॅन्युअलचा वापर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी https://ycmou.unionline.in ही लिंक  देण्यात आली आहे.


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT