मदन पवार
मदन पवार sakal
छत्रपती संभाजीनगर

उमरगा : शुन्यातुन विश्व निर्माण केलेला 'पेटींग' क्षेत्रातील गुणवंत कलावंत

अविनाश काळे

उमरगा : जि. उस्मानाबाद ग्रामीण भागातील तरुण विविध क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करुन सातासमुद्रापलीकडे नावलौकिक प्राप्त करताहेत. नौकरीसाठीच शिक्षण असते, असे नव्हे तर त्यात व्यावसायिकता आणि स्वतःमध्ये असलेल्या कलाविष्काराच्या गुणाला व्यापकता मिळते. हे सिद्ध करुन दाखविले आहे औराद (ता. उमरगा जि. उस्मानाबाद) येथील मदन किसन पवार यांनी. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मदनचे प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण गुंजोटी (ता. उमरगा) येथील श्रीकृष्ण विद्यालयात झाले.

शालेय जीवनापासुनच चित्र रेखाटण्याची आवड असल्याने पेटींग क्षेत्रात करियर करण्याचा निश्चय मदनने केला आणि प्रतिकुल परिस्थितीत मोठ्या जिद्दीने यशाचे एक - एक टप्पे त्यांनी पुर्ण केले. वास्ताविक: चित्र रंगविण्यात पोराचं आयुष्य यशस्वी होईल का असा संभ्रम वडिलांना होता. मात्र तोच पोरगा आता कुटुंबाचा आधार ठरला आहे. २००६ मध्ये औरंगाबादच्या शासकिय चित्रकला महाविद्यालयात कला शिक्षकाचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर मुंबईच्या जे.जे. स्कुल ऑफ ऑर्टमध्ये बॅचलर ऑफ फॉईन आर्टमध्ये (बी.एफ.ए.) प्रवेश घेताना त्या वेळी पहिल्यांदाच सीईटी (प्रवेश पूर्व परिक्षा) लागू झाली होती.

त्यावेळी मदन सहाव्या रॅकिंगमध्ये आल्याने लागलीच बी.एफ.ए. ला प्रवेश मिळाला. चार वर्षाच्या पदवी शिक्षणात गुणवत्तेत प्रथम स्थान मिळाल्याने २०१० साली मदनला फेलोशिप मिळाली, शिवाय सर जे.जे. स्कुल ऑफ ऑर्टमध्ये अध्यापनाची संधी मिळाली. त्यानंतर २०१३ मध्ये मास्टर ऑफ फॉईन आर्ट (एम.एफ.ए.) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुजरात राज्यातील " वडोदरा ऑर्ट रेसिडन्सी" मध्ये कला क्षेत्रातील उच्चतम ज्ञान प्राप्तीसाठी तीन महिन्यासाठी संधी मिळाली. संपूर्ण देशाभरातुन आलेल्या विद्यार्थ्यात मदन हा महाराष्ट्रातुन एकमेव होता. विरारच्या (मुंबई) व्हीवॉ (Viva) स्कुल ऑफ आर्चिटेक्चर येथे मदन गेली अनेक वर्षापासुन अध्यापनाचे काम करतो आहे. अध्यापनाबरोबरच कला क्षेत्रातील व्यावसायिकतेत त्यांनी कौशल्य निर्माण केले आहे.

दहावी "नापास" ने दिली नवी उर्जा !

दहावीच्या परिक्षेत नापास झाल्यानंतर मदनला पुढच्या भविष्याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. पूण्याला पेंटरकडे कांही महिने काम केले. पण काम कठीण आणि दाम कमी, यामुळे परत गावाकडे येऊन दहावीचा अभ्यास केला. भविष्यात कला क्षेत्रात करियर करण्यासाठी बारावीची परीक्षा महत्वाची असल्याने भरपुर अभ्यास केला. चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाल्याने पुढचे टप्पे यशस्वी होत गेले. शालेय जीवनात निसर्गातील बदलाची नेहमी उत्सुकता असायची. त्याचे चित्र रेखाटण्याचे कौशल्य आत्मसाद करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कलाशिक्षक जीवन चव्हाण, सहशिक्षक अजय गायकवाड आदी शिक्षकांची प्रेरणा मोलाची ठरल्याची माहिती मदनने दिली.

दिल्लीच्या ललित कला अकादमीच्या पुरस्काराने गौरव

२०१५ मध्ये दिल्लीच्या राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या ५६ व्या राष्ट्रीय प्रदर्शनात मदन पवार यांना राष्ट्रीय अकादमी पुरस्कार मिळाला. कोरोना संसर्गामुळे पहिल्या लाटेत लॉकडाऊनच्या स्थितीचे रेखाटलेले वस्तुस्थितीजनक आणि उत्तम कलाकृतीला महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाचा " उत्कृष्ठ कलाकृती" पुरस्कार मिळाला.

प्रथम पुरस्कार - सीबीएफ चित्रपट पुरस्कार महोत्सव चित्रकला स्पर्धा मुंबई २०१९,

हैद्राबाद आर्ट सोसायटी पुरस्कार, हैदराबाद २०१९, तृतिय पुरस्कार राज्य कला वार्षिक प्रदर्शन आणि स्पर्धा २०१९, प्रथम पुरस्कार - ८४ वा इंडियन अकादमी ऑफ फाइन आर्ट्स प्रदर्शन अमृतसर २०१८, बॉम्बे ऑर्ट सोसायटीचा बेस्ट ऑर्ट वर्कचा पुरस्कार, पीडीएएफ महाराष्ट्र राज्य पुरस्कार मुंबई २०१९, पुणे आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचा सर्वोत्कृष्ट चित्रकला पुरस्कार २०१५, सर जे जे कला महाविद्यालय, मुंबईचा मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार, मुंबई विद्यापीठ कला स्पर्धत पुरस्कार याशिवाय महाविद्यालयीन काळात, विविध राष्ट्रीय, राज्यस्तरीय प्रदर्शनात मदनला जवळपास पन्नासहुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात मदनच्या कलाकृतीने अनेकांना भूरळ घातली आहे. मदनने प्राप्त केलेल्या बहुमानाची प्रेरणा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी घेतली तर कलाक्षेत्राला वेगळा लौकिक प्राप्त होऊ शकतो.

" ग्रामीण भागातीत विद्यार्थी व तरुणांमध्ये विविध कलागुण असतात. सुप्तस्थितीत असलेले कलागुणाचा शिक्षणातुन उलगडा मिळू शकतो. डिजीटल युगातही कला क्षेत्र टिकून आहे, वेगवेगळे कौशल्य आणि कर्तत्व दाखवत नेहमी स्पर्धत राहिल्यास कला क्षेत्रातही करियर करण्याची संधी मिळते.

मदन पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT