Vacancies for anganwadi assistants applications for higher education 416 aspirants for 63 seats
Vacancies for anganwadi assistants applications for higher education 416 aspirants for 63 seats esakal
छत्रपती संभाजीनगर

Unemployment : जागा मदतनिसाची अन् अर्ज उच्चशिक्षितांचे; ६३ जागांसाठी ४१६ इच्छुक

हबीबखान पठाण

पाचोड : बारावी उत्तीर्ण शैक्षणिक अर्हता असलेल्या पाचोडसह पैठण तालुक्यातील ६३ अंगणवाडी मदतनीसांच्या जागांकरिता चक्क उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज केल्याचे निदर्शनास आले आहे. यावरुन तालुक्यात बेरोजगारीचे गंभीर चित्र आहे. येथील अवघ्या ६३ जागांसाठी तब्बल ४१६ जण इच्छुक आहे.

या पदासाठी मागविण्यात आलेल्या अर्जात चक्क बी.एस्सी, एम.बीए, डबल एम.ए, डी एड, बी.एड, एम.एस्सी अशा उच्च शिक्षित महिला, तरुणींनी तालुका एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालयात अर्ज दाखल केले.

एकंदरीत मिळणाऱ्या केवळ पाच हजार पाचशे रुपये मानधनाची नोकरी मिळविण्यासाठी चाललेली स्पर्धा, धडपड पाहून बेरोजगारीची भीषणता लक्षात येते. पाच जुलैपासून १८ जुलैपर्यंत पाचोडसह पैठण तालुक्यातील ४० अंगणवाड्यात ६३ मदतनिसांची भरती करण्याकरिता केवळ बारावी उत्तीर्ण अर्हताधारक तरुणी, महिलांकडून अर्ज मागविण्यात आले.

केवळ पाच हजार पाचशे रुपये मानधनाच्या या पदासाठी ४१६ एम.बी ए, डबल एम.ए, डी एड, बी .एड, एम.एस्सी.,एम.कॉम आदी उच्चशिक्षीतांनी या भरती स्पर्धेत भाग घेत मानधन तत्त्वाच्या नोकरीसाठी अर्ज सादर केले.

दिवसेंदिवस बेरोजगारीत पडणारी भर पाहता उच्च शिक्षितही अंगणवाडीच्या मदतनीस पदासाठी इच्छुक असल्याचे विदारक चित्र समोर आले. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून लहान बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासोबतच कुपोषणमुक्तीचे काम केले जाते.

मदतनीस पदासाठी निवड झाल्यानंतर त्यांना अंगणवाडीची स्वच्छता करणे, पोषण आहार शिजविणे, लसीकरणासाठी बालके व स्तनदा गरोदर मातां ना बोलावणे, अंगणवाडीत येणाऱ्या बालकांना घरी सोडणे, पोषण आहार वाटप करणे आदी कामे करावी लागणार आहे.

पाचोड बु, सोनवाडी बु, हर्षी बु, लाखेगाव, थापटी तांडा, पाडळी,पोरगाव, खेर्डा, पुसेगाव, डोणगाव, आडुळ, रजापूर, घारेगाव, हिरापूर, बालानगर, कासार पाडळी, तांडा बु, पारुंडी. सुलतानपूर, वरुडी बु, नवगाव, आपेगाव, वडवाळी,

टाकळी अंबड, वाघाडी, मायगाव, आवडे उंचेगाव, आडगाव, कडेठाण बु, कडेठाण खुर्द, देवगाव,देवगाव तांडा, विहामांडवा, खंडाळा दाभरूळ, शिवाजीनगर, चौंढाळा, मिरखेडा, चिंचाळा, कोळी बोडखा, इंदेगाव कापूसवाडी, नानेगाव, नांदर, दावरवाडी, सोलनापूर, पोरगाव, रहाटगाव, केकत जळगाव, भगवाननगर याठिकाणी मदतनिसांच्या जागा भरण्यात येणार आहे.

बारावी उत्तीर्ण अर्हतेवर अंगणवाडी मदतनिसांच्या भरतीसाठी अर्ज मागितले असता ४१६ महिला, तरुणींनी अर्ज सादर केले आहेत. यात एम.बीए, डबल एम. ए., डी एड, बीएड, एम.एस्सी, बी .ए. बी कॉम अशा उच्च शिक्षितांनी अर्ज केल्याचे पाहून बेरोजगारीची वास्तविकता उघड होते.

-शिवाजी वने, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी, पैठण

मदतनिसाची जागा बारावीवर आधारित असली तरी मी बी.ए च्या अर्हतेवर अर्ज दाखल केला. बेकार राहण्यापेक्षा छोटी-मोठी नोकरी बरीच आहे.

- अपर्णा पाचोडे, उमेदवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT