शहरात एक दिवस उशिराने पाणी
शहरात एक दिवस उशिराने पाणी Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : शहरात एक दिवस उशिराने पाणी; वेळापत्रकाचे नियोजन कोलमडले

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : नवीन जलवाहिनी टाकताना चितेगाव येथे पोकलेनचा धक्का लागल्याने जुनी जीर्ण झालेली जलवाहिनी शनिवारी (ता. नऊ) सायंकाळी फुटली. दुरुस्ती पूर्ण झाली, पण जलकुंभामध्ये पाणी येण्यासाठी तब्बल २४ तास लागले. यामुळे पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, शहराला एक दिवस उशिराने मिळणार पाणी मिळणार आहे.

शहराच्या २ हजार ७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या सुरू आहे. याअंतर्गत २५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी अंथरली जात आहे. ही जलवाहिनी जुन्या ७०० आणि १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला लागूनच अंथरली जात असल्याने जेसीबी, पोकलेनचा धक्का लागून जुन्या जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत आहेत. आजवर सात ते आठवेळा नवीन जलवाहिनी टाकताना जुनी जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडल्या आहेत.

शनिवारी चितेगाव परिसरात नवीन जलवाहिनी अंथरल्यानंतर त्यावर माती टाकली जात असताना जुन्या १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला पोकलेनचा धक्का लागला. यात जलवाहिनीला भगदाड पडले. त्यातून पाण्याचे उंच फवारे सुरू झाले. यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले. यानंतर शनिवारी सायंकाळी सातला पाणीपुरवठा बंद करून जलवाहिनी रिकामी करायला सुरवात झाली.

केवळ जलवाहिनी रिकामी करण्यासाठीच तब्बल ६ तास लागले. रात्री बारापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला. रविवारी पहाटेपर्यंत वेल्डिंगचे काम पूर्ण करण्यात आले.

परंतु, प्लेट नसल्याने ही प्लेट तयार करून दुरुस्ती पूर्ण करण्यासाठी रविवारी दुपारचे १२ झाले. या दुरुस्तीनंतर दुपारी एकला जायकवाडीतून एक पंप सुरू करून जलवाहिनीतील एअर काढण्यात आला. नक्षत्रवाडीत पाणी पोचल्यानंतर हळूहळू एक एक करून पाचही पंप सुरू करण्यात आले. शहरातील जलकुंभांत पाणी दाखल होण्यासाठी सायंकाळचे सहा झाले. यामुळे तब्बल २४ तास शहराचा पाणीपुरवठा बंद राहिला.

नियोजन करताना दमछाक

शहरात पाणी आल्यानंतर पहिले शनिवारी सायंकाळी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा केला जाणार होता, त्या वसाहतींना पाणीपुरवठा करण्यास प्रारंभ करण्यात आला. टप्प्यांचे नियोजन करताना पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची अक्षरशः दमछाक झाल्याचे पहायला मिळाले.

जलवाहिनी पूर्ण रिकामी करून दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत जवळपास २४ तास लागले. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे गेले आहे.

– के.एम. फालक, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: देशातील 'या' राज्यात होत आहे सर्वाधिक मतदान, वाचा दुपारी 1 पर्यंतची आकडेवारी

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT