Girl Donate Chief Minister Relief Fund, Ausa News
Girl Donate Chief Minister Relief Fund, Ausa News 
मराठवाडा

वाढदिवसाचा खर्च टाळून मुख्यमंत्री निधीला मदत, तरुणीने दाखवली संवेदनशीलता

जलील पठाण

औसा (जि.लातूर) : आपला वाढदिवस जंगी आणि जिवलग मित्र-मैत्रिणी व परिवारातील लोकांमध्ये साजरा करण्यात यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग या वाढदिवसाला ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे खर्च होतो. मात्र वाढदिवस साजरा न करता जो खर्च येणार आहे तो चांगल्या कामासाठी उपयोगात आणणारे दुर्मिळच. या सर्व प्रकाराला फाटा देत सामाजिक भान आणि जबाबदारी ओळखून औसा शहरातील एका वीसवर्षीय तरुणीने कोरोना विरोधात सुरू असलेल्या लढाईत वीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.


येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत दुकान असलेले अडत संघटनेचे अध्यक्ष मदनलाल झंवर यांची कन्या कीर्ती झंवर हिचा शुक्रवारी (ता.२२) विसावा वाढदिवस होता. वडील मदनलाल झंवर यांना पहिल्यापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. कोरोनाच्या लढाईत शासन करीत असलेले काम आणि त्यासाठी कमी पडणारा निधी याची त्यांना पूर्ण कल्पना होती. घरात मुलीचा धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करून क्षणिक आनंद घेण्यापेक्षा हा खर्च न करता मुख्यमंत्री सहायता निधीत हा पैसा जमा करण्याची कल्पना त्यांनी आपली मुलगी कीर्तीला सांगितली. तिलाही ही कल्पना पटली. शुक्रवारी सकाळी सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्याकडे विसाव्या वाढदिवसानिमित्त वीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला.


माझ्या वाढदिवसाचा हा खर्च राज्याच्या संकटात कामाला यावा हे माझं भाग्य आहे. सामाजिक भान ठेवून काम करा ही वडिलांची शिकवण असल्याने कोरोनाच्या या लढाईत माझा खारीचा वाटा मी उचलत असल्याचे खूप मोठे समाधान आहे.
- कीर्ती झंवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT