Bailpola
Bailpola 
मराठवाडा

पोळा सण यंदा कोरडा जाण्याची चिंता

सुषेन जाधव

औरंगाबाद - पोळा आणि पावसाळा या दोघांचे तसे खूपच जवळचे नाते. पोळा सणाच्या आदल्या दिवशी खांदेमळणी करून, धुवून बैलांना चरायला सोडले जाते खरे; मात्र यंदा पाऊसच नसल्याने मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी चाराच उगवला नाही. परिणामी लुसलुशीत गवत हे शब्द केवळ ऐकण्या-बोलण्यापुरतेच राहिले आहेत. निसर्गाने मुक्‍या जनावरांची तरी परीक्षा बघू नये, या आशेने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. 

दरवर्षी या दिवसांत खरीप पिके कपाशी, भुईमूग, मका या पिकांत पोळ्यापर्यंत आंतरमशागतीची कामे झालेली असत. हा जणू निसर्गाचा नियमच होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा नियम निसर्गाने पुरता मोडीत काढल्याची भावना भिवगाव (ता. वैजापूर) येथील शेतकरी विनोद गायके यांनी व्यक्त केली.

पोळ्याच्या दोन दिवस आधीपासून नदी, नाले, ओढ्यावर बैल धुण्यासाठी एकच गर्दी झालेली असायची; मात्र दिवसेंदिवस जनावरांच्या कमी होत जाणाऱ्या संख्येबरोबरच पावसाचेही दिवस कमी झाले. परिणामी उपलब्ध पशुधनाला पोळा आला की एक-दोन बादली पाण्यात आंघोळ घालावी लागत आहे.

सण दुरावत चालला 
१० ते १५ वर्षांपूर्वीचा बैल पोळा म्हणजे बैलांना रंगवून, झुली टाकून त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढली जात होती, हेच वातावरण आजही आहे. मात्र, यांत्रिकीकरण झाले. परिणामी पशूंची संख्या कमी होत गेली. यामुळे हा सण दुरावत चालला. त्यानंतर पाऊस कमी होत गेला. यात दोष कुणाचा याच्या फंदात पडण्यापेक्षा आजघडीला शेतकऱ्यांना पावसाची आस लागलेली आहे. काहीही झाले तरी ‘पावसा, आता तरी पड रे बाबा’ अशी आर्त साद बिलोली तालुक्‍यातील गहिनीनाथ साळवे या शेतकऱ्याने घातली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT