himaytnagar.JPG
himaytnagar.JPG 
मराठवाडा

नांगरठी करताना शेतात आढळली सुबक मूर्ती

प्रकाश जैन


हिमायतनगर, (जि.नांदेड) ः तालुक्यातील पैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या वाढोणा नगरीला तीर्थक्षेत्र श्री परमेश्र्वर मंदिराचा इतिहास लाभलेला या नगरीत अवतीभवती अनेक प्राचीन मंदिरांचे अवशेष आढळून येतात. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मागील महिन्यात येथील एका शेतकऱ्यास आला असून शेतीची नांगरठी करताना सिद्धिविनायक गणपतीची शाबूत मूर्ती सापडली. त्या मूर्तीला शेंदूर लावून आजच्या मुहूर्तावर अभिषेक महापुजेने विधिवत प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. सिरंजनी रस्त्यावरील शेतकऱ्यांचा विघ्नहर्ता संबोधित भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत आहेत.


याच सिरंजनी - एकंबा रस्त्यावर पुरातनकालीन श्री बसवेश्वरांचे मंदिर असून मंदिर जीर्णोद्धारात अनेक मूर्तींची अवशेष सापडलेले आहेत. अनेक संतमहात्म्यांच्या चरण स्पर्शाने वाढोणा शहर पवित्र झाले असल्याच्या अख्यायिका वृद्ध भाविकांकडून सांगण्यात येत असतात. शहरासह या परिसरात नेहमी कुठे ना कुठे मूर्ती आढळून येतात. याचाच प्रत्यय म्हणून की काय, सिरंजनी रस्तावरील शेतकरी गोपीनाथ पोशेट्टी यांच्या शेत सर्वे नंबर ७३ मधील शेतजमिनीची नागरठी करताना मागील महिन्यात भव्य शिळा लागली. त्यामुळे शेतकऱ्याने काय आहे ते पाहण्यासाठी आजूबाजूला खोदकाम केले. तेंव्हा कुंटलहून अधिक वजनाची सिद्धिविनायकाची मूर्ती असल्याचे लाक्षात आले. 

हेही वाचा - ‘उज्ज्वल नांदेड’ अभ्यासाचा नवा पॅटर्न ​
सदर मूर्ती वजनदार असल्याने बाहेर काढणे कठीण होते. पेरणीसाठी अडचण होईल म्हणून शेतकऱ्याने दोन-तीन दिवसांनंतर जेसीबीद्वारे सदर मूर्ती बाहेर काढून शेतीच्या काठावर ठेवली. या मूर्तीबरोबर आजूबाजूला नंदी आणि इतर मूर्तींची अवशेष आढळून आले असल्याने पुरातन काळात येथे एखादे मंदिर असावे, असा अंदाज येथे भेट दिलेल्या भाविकांनी व्यक्त केला आहे. मूर्ती आढळल्यानंतर शेतकऱ्याने शेतीमध्ये चणा पेरला असून पीक आजघडीला फुलावर आले आहे. याच जमिनीतून निघालेली मूर्ती अशी उघडी ठेऊ नये, असे काही जुन्या जाणकारांनी सांगितल्याने भव्य-दिव्य आंब्याच्या झाडाखाली ओटा तयार करून मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापणा पुरोहित विशाल नारायण स्वामी महाराज यांच्या मधुर वाणीमध्ये केली आहे.

मूर्तीचे स्वरूप आणखीनच उजळले
सदर मूर्तीला शेंदराचा लेप लावल्याने मूर्तीचे स्वरूप आणखीनच उजळले असून सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याने ये - जा करणारे आणि गणरायाचे भक्त दर्शनासाठी गर्दी करत आहेत. आगामी काळात या मूर्तीच्या सुरक्षेसाठी शेड उभे करण्याचा मानस शेतकऱ्याने व्यत्क्त केला असून या भागातील चिंतांग्रस्त शेतकऱ्यांचे विघ्न दूर करणारा हा सिद्धिविनायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT