Beed crime news
Beed crime news 
मराठवाडा

प्राध्यापिकेला व्हॉट्सअपवरुन अश्‍लील व्हिडीओची लिंक पाठवणं भोवलं; प्राध्यापकाची तुरुंगात रवानगी

सकाळवृत्तसेवा

बीड: महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापिकेचा विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या प्राध्यापकास पाच वर्षे सश्रम कारावास व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी (ता. चार) विशेष अतिरिक्त सत्र न्यायायाधीश डी. एन. खडसे यांनी सुनावली. गजानन नरहरी करपे (वय ४१, ह. मु. स्वराज्यनगर बीड) असे शिक्षा सुनावलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.

शहरातील एका शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या गजानन करपे याने याच महाविद्यालयातील प्राध्यापिकेला व्हॉट्सअपवरुन अश्‍लिल व्हिडीओ असलेली लिंक पाठविली. नोव्हेंबर २०१७ मध्ये घडलेल्या या प्रकारावरुन महाविद्यालय प्रशासनाने गजानन करपे यास निलंबीत केले होते.

नंतर या प्राध्यापिकेस रस्‍त्यात आडवून जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यामुळे विनयभंग केल्याची फिर्याद पिडीतेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली. तत्कालिन उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी तपास करुन दोषारोपपत्र सादर केले. पुराव्यांच्या अधारे विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांनी गजानन करपे यास दोषी ठरवत त्यास पाच वर्षे सश्रम कारावास व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT