sakal
sakal
मराठवाडा

बीड: अंबाजोगाई तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा द्या

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई: अंबाजोगाईला जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या स्थानिक शाखेच्यावतीने शुक्रवार (ता. १७) रोजी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त ध्वजवंदन झाल्यानंतर सकाळी दहा वाजता उपजिल्हाधिकारी यांना मागण्यांचे विविध निवेदन देण्यात आले. टपाल कार्यालय, शिवाजी चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर फलक घेऊन निदर्शने करण्यात आली. अंबाजोगाईला जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा. मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाई येथे उभारावे. काळवटी तलावाची उंची वाढविण्यात यावी.

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामिण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात यावीत. बुट्टेनाथ साठवण तलाव तातडीने बांधावा. मराठवाडयाचा अनुशेष भरून काढावा. घाटनांदूर ते अंबाजोगाई लोहमार्ग तयार करावा. औरंगाबाद येथे मंत्री मंडळाची बैठक नियमित घेण्यात यावी. परळी ते बीड रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.

अप्पर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपिन पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी मराठवाडा जनता विकास परिषद स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य दामोदर थोरात, सचिव प्रा.रमेश सोनवळकर, शिवाजी खोगरे, तोंडारे, अ‍ॅड. संतोष पवार, प्रा. सोनटक्के, प्रा.सागर कुलकर्णी, प्रा.डॉ. भाऊराव मुंडे, दयानंद देशमुख, बाबूराव बाभुळगावकर, विलास काचगुंडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT