beed crime news
beed crime news 
मराठवाडा

वाळूमाफियांचा सुळसुळाट! मंडळ आधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; टिप्पर घातला अंगावर

सकाळवृत्तसेवा

गेवराई (बीड): अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पाडळसिंगी टोलनाका परिसरात पकडला. यावेळी टिप्पर मालकाने मंडळाधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन टिप्पर पळून नेल्याची घटना शुक्रवार (ता.नऊ) रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदार सचिन खाडे व इतर कर्मचारी पाडळसिंगी टोलनाका येथे वाळू वाहतुकीचा परवाना चेक करत होते. त्यानंतर काही कामानिमित्त तहसीलदार गेवराईला गेले व पावत्या चेक करणे सुरू ठेवा असे येथे उपस्थित असलेल्या मंडळ अधिकारी व तलाठी यांना सांगितले. यावेळी वाळूने भरलेला (एमएच 23 डब्लू -4299) टिप्पर आला. त्यास अडवून चालकाकडे पावतीची चौकशी केली असता. चालका जवळ संपलेली पावती आढळून आली. त्यामुळे सदरील टिप्पर कारवाईसाठी घेऊन जाणार, तेवढ्यात तिथे एका काळ्या स्कार्पिओ (एमएच 23 एडी-5990) मधून वाळूमाफिया आले व माझी गाडी असल्याचे सांगत गाडी पळवली.

टिप्परचा पाठलाग केला असता शेख जुनैद चाँद व चालकाने आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशाने आमच्या गाडीला धडक दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात मंडळअधिकारी अमोल सुधाकर कुरुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत वरून कलम 307, 353, 379, 427 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून टिप्पर व चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

वाळूचे शासकीय लिलाव घाट सुरू असताना देखील गोदावरी पात्रातील अनेक ठिकाणी वाळू माफिया वाळू उपसा करत आहेत. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. ही अवैध वाळू उपसा व वाहतूक करण्यास कोण जबाबदार आहे याची चर्चा होत आहे. दरम्यान वाळू घाटावरून वाळू वाहतूक होत असली तरीपण वाळूचे दर कमी झाल्याचे यामुळे दिसून येत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT