Vimalbai-Bhausaheb
Vimalbai-Bhausaheb 
मराठवाडा

पतीने पत्नीच्याच साडीने घेतला झाडाला गळफास

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - आजारी पत्नीचे निधन झाल्यानंतर तिच्या विरहात पतीनेही तिच्याच साडीने घराजवळच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. ही खळबळजनक घटना मुकुंदवाडीतील रामनगर येथे रविवारी (ता. २८) पहाटे तीननंतर उघडकीस आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, भाऊसाहेब हिरामन गोसावी (वय ६५, रा. रामनगर, मुकुंदवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ते महाराष्ट्र जनरल कामगार युनियन व असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग वर्कस संघटनेचे सचिव होते. निवृत्तीनंतर ते कुटुंबात रममान होते. त्यांच्या पत्नी विमलबाई गोसावी या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यासाठी भाऊसाहेब यांनी बरेच प्रयत्नही केले; परंतु विमलबाई यांचे रविवारी (ता. २८) पहाटे निधन झाले. ही बाब भाऊसाहेब यांच्या लक्षात येताच पत्नीच्या निधनाचा धक्‍का त्यांना सहन झाला नाही. मुलगा घरातील वरच्या मजल्यावर झोपेत होता.

त्याला न उठवता पैठण येथील पुतण्याला फोन करून भाऊसाहेब यांनी पत्नीच्या निधनाची माहिती दिली. यानंतर पत्नीची साडी घेऊन ते घराबाहेर आले. लगतच्या झाडाला साडीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, पुतण्याने भाऊसाहेब यांचा मुलगा विजयला फोनवरून विमलबाई यांच्या निधनाबाबत चौकशी केली. खात्रीसाठी मुलगा खोलीत गेला त्यावेळी आईचे निधन झाल्याचे व वडील घरात नसल्याचे दिसले. यादरम्यान आप्तेष्ट मंडळीही घरी दाखल झाली. त्यावेळी भाऊसाहेब झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसले. यानंतर घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल केला. या घटनेप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उपनिरीक्षक गवारे यांच्या सूचनेनुसार, शिवाजी मनगटे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT