poison
poison Sakal
मराठवाडा

Bhokardan News : तारीख पे तारीख’ला वैतागला; जालन्यात तरुणाने न्यायाधीशांसमोरच उचललं टोकाचं पाऊल

तुषार पाटील

भोकरदन येथील न्यायालयात खटल्याचे काम सुरू असताना एका फिर्यादीने न्यायदान कक्षातच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

भोकरदन - सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने भोकरदन येथील न्यायालयात फौजदारी खटल्याचे काम चालू आहे. मंगळवारी दुपारी भोकरदन येथील न्यायालयात खटल्याचे काम सुरू असताना एका फिर्यादीने न्यायदान कक्षातच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

मंगळवारी भोकरदन दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायाधीश श्रीमती पाटील यांच्यासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान सरकारी वकील हे साक्षीदार कक्षात जबाब घेत असताना त्या फिर्यादीने सर्वांसमक्ष विषारी औषध प्राशन केले. फिर्यादीचे जवाब नोंदवणाऱ्या सरकारी वकील श्रीमती वानखेडे यांना काही समजण्याच्या आत फिर्यादीने हे कृत्य केले.

युवकाच्या तोंडातून फेस आला असता सरकारी वकील तत्काळ बाहेर पळत आल्या व पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी फिर्यादीला प्रथमोपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या प्रकाराने न्यायालयात एकच खळबळ उडाली होती.

सदरील व्यक्तीचा शेतीचा वाद हा अनेक वर्षापासून न्यायालयात प्रलंबित आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. सततच्या विलंबाच्या क्लिष्ट न्यायप्रक्रियेमुळे कंटाळून त्याने हे पाऊल उचलले व नाईलाजाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीचे म्हणणे असल्याचे न्यायालयाच्या आवारातील उपस्थितांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या घटनेत अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT