Gutkha
Gutkha 
मराठवाडा

चॉकलेट, बिस्कीट विक्रीच्या नावाखाली गुटख्याचा धंदा

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - चॉकलेट, बिस्कीट विक्रीच्या नावाखाली गुटख्याचा धंदा करणाऱ्यावर छापा घालून सिडको पोलिसांनी एक लाखाचा माल जप्त केला. यात एका संशयिताला ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (ता. पाच) रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली.

मिसारवाडीत गुटखा साठवणूक व विक्री होत असल्याची माहिती सिडको पोलिसांना समजली. त्यानंतर त्यांनी मिसारवाडीच्या गल्ली क्रमांक दहामध्ये बासित अन्सारी याच्या घरावर छापा घातला. त्यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवाजासमोर पोलिसांनी आडवे येत त्याला पकडले. तो गोळ्या, बिस्कीट, चॉकलेट विक्री करण्याच्या नावाखाली गुटखा विक्री करीत असल्याचे समोर आले. त्याच्या घरातून पोलिसांनी गुटखा व पानमसाला असा सुमारे एक लाखाचा माल जप्त केला. बासितची पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी तो मूळ मध्य प्रदेशातील असून एक वर्षापासून औरंगाबादेत रोजगारासाठी आला होता. येथे आल्यानंतर त्याने गुटख्याची विक्री सुरू केली.

पानटपरी चालकांना तो माल विकत होता. त्याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ही कारवाई उपनिरीक्षक भरत पाचोळे, नरसिंग पवार, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, स्वप्नील रत्नपारखी, सुरेश भिसे, विजय भानुसे, किशोर गाढे यांनी केली. अन्नसुरक्षा अधिकारी एस. टी. जाधवर यांच्या फिर्यादीवरून सिडको पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT