मराठवाडा

औरंगाबाद लोकसभा तयारीसाठी भाजपची बैठक ; चार तास चर्चा

प्रकाश बनकर

औरंगाबाद : शिवसेनाच्या गड असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 2019 ला कमळ फुलवण्यासाठी भाजपची कसून तयारी सुरू आहे. लोकसभा बरोबर विधानसभा निवडणुकीचीही जोरदार तयारी करण्यात आली आहे. यासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे व राज्य संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासह वरिष्ठांच्या बैठका सुरू आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात हा भाजपसाठी प्रतिष्ठेची विषय बनला असून यासाठी पूर्ण ताकत पणाला लावण्यात येत आहे. रविवारी (ता.21) जिल्ह्यातील सहा तालुक्‍यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्या समवेत गुप्त आढावा बैठक घेण्यात आली.

लोकसभा व विधानसभाच्या निवडणुकीत युती होवो अथवा न होवो, भारतीय जनता पक्षाने स्वबळाची तयारी मात्र दोन वर्षांपासून सुरु केली आहे. प्रत्येक वार्ड,बुथ निहाय नियोजनबद्ध पद्धतीने भाजप दोन्ही निवडणूकीसाठी तयारी करीत आहेत. यासाठी नियमीतपणे विधानसभा निहाय बैठका घेतल्या जात आहेत.भाजपचा खासदार नसलेल्या मतदार संघातही जोर लावला जात आहे. यातील प्रमुख असलेल्या औरंगाबाद हे प्रमुख केंद्र ठरत आहेत. रविवारी जालना रोडवरील हॉटेल सिल्वर इन येथे सकाळी दहापासून दुपारी दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरु होती.

यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्‍ते शिरीष बोरळकर, आमदार अतुल सावे,शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, प्रविण घुगे, मनोज पांगारकर, बसवराज मंगरुळे, माजी महापौर भगवान घडामोडे, संघटन मंत्री भाऊराव देशमूख, कचरू घोडके, गजानन बरवाल,बाळासाहेब गायकवाड, प्रमोद राठोड, विजय औताडे, हेमंत खेडकर दिलीप थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पदाधिकाऱ्यांनी गाफिल राहू नये- दानवे 

या बैठकीत लोकसभेसाठी विधानसभा निहाय कशाप्रकारे तयारी करण्यात आली, याचा आढावा प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी घेतला. युती होणार नसल्याचे गृहीत धरूनच या बैठकीत बुथ निहाय चर्चा झाली. यासह कुमकुमावत मतदारसंघावर विशेष चर्चा करण्यात आली. यात मार्गदर्शन करताना दानेव म्हणाले, युती होईल तेव्हा होईल पण पदाधिकाऱ्यांनी गाफिल राहता कामा नये.

पूर्वी युती झाल्यानंतर मराठवाड्यात पक्षातर्फे उमेदवार पहावा लागत होतो. आता मात्र चित्र उलटे आहे. आता लोकसभा आणि विधानसभेसाठी अनेक जण स्वत: हुन पुढे येत आहे. यात ग्रामपंचायत,पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेपर्यंत चित्र पाहिल्यास आपण मजबूत आहोत.याचा फायदा घेतला पाहिजेत. लोकसभा आणि विधानसभेत कमळ फुलविण्यासाठी पुर्ण ताकतपणाला लावावी असा सल्लाही यावेळी रावसाहेब दानवे यांनी दिला. 

लोकसभेसाठी पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप 

आगामी 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजप नियोजनबद्ध काम करीत आहे. यासाठी औरंगाबाद मतदार संघातही संयोजनाची जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. औरंगाबाद लोकसभेची संयोजनाची जबाबदारी माजी महापौर भगवान घडामोडे यांच्यावर सोपविण्यात आली. तर प्रत्येक विधानसभा निहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT