Raosaheb Danve
Raosaheb Danve 
मराठवाडा

राम मंदिरावर दिलेल्‍या उत्तराने दानवेंची पंचाईत

सकाळवृत्तसेवा

हिंगोली : येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (ता.२६) राम मंदिराच्‍या प्रश्नावर गडबडीत दिलेल्‍या उत्तराने चांगलीच पंचाईत झाली. सर्वच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात का असे  सांगत त्‍यांनी वेळ मारून नेली.

येथील शासकीय विश्रामगृहात श्री. दानवे यांच्‍या उपस्‍थितीत पत्रकार परिषद झाली. यावेळी आमदार तान्‍हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, भाजप नेते अॅड. शिवाजी जाधव, रामरतन शिंदे, यांच्‍यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्‍थित होते.

यावेळी दानवे यांनी आगामी निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर दौरा असल्‍याचे स्‍पष्ट केले. विदर्भ व खानदेशातील दौऱ्यानंतर मराठवाड्यात दौरा सुरु आहे. वन बुथ टेन युथची कामे केली का याची तपासणी बैठकीतून केली जाणार आहे. तर निवडणूक जिंकणे हा दौऱ्याचा उद्देश असल्‍याचे त्‍यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेना यापूर्वीही सोबत होती व आताही सोबत आहे असे स्‍पष्ट करत आगामी निवडणुकीत युती झाल्‍यास काही फेरबदल होतील असे त्‍यांनी स्‍पष्ट केले. जिंकणार तिथेच लढणार असे त्‍यांनी यावेळी स्‍पष्ट केले. 

राममंदिर बांधकामाच्‍या मुद्यावर पत्रकारांनी विचारलेल्‍या प्रश्नाला त्‍यांनी सहज उत्तरे दिली. आयोध्येत राममंदिर व्‍हावे हा सर्व हिंदू बांधवांचा श्रद्धेचा प्रश्न आहे. मात्र आतापर्यंत मंदिर का उभारले गेले नाही या प्रश्नावर त्‍यांनी गडबडीत तेथील जागा काँग्रेसने अधिग्रहित केली असे उत्तर दिले. मात्र नेमकी कोणती जागा असा प्रश्न पत्रकाराने उपस्‍थित केल्‍यानंतर श्री. दानवे शांत झाले. पत्रकारांच्‍या सर्वच प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात का असा प्रतिप्रश्न करत त्‍यांनी उत्तर देण्याचे टाळले. प्रकरण वाढत असल्‍याचे लक्षात येताच उपस्‍थित नेत्‍यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT