BJP
BJP 
मराठवाडा

भाजप तालुकाध्यक्षपदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता

नवनाथ इधाटे

फुलंब्री (जि. औरंगाबाद) : भाजपचे तालुकाध्यक्ष गोविंद वाघ यांचे दीर्घ आजामुळे सुमारे दोन महिन्यापूर्वी निधन झाले. त्यामुळे भाजपच्या तालुकाध्यक्ष पद आपल्याच नेत्याला मिळावे यासाठी तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे समर्थक आपापल्या पद्धतीने सोशल मिडीयावर पोस्टरबाजी करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीनंतरच तालुकाध्यक्ष पदाची निवड केली जाणार असल्याची माहिती भाजपच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली.

केंद्रात व राज्यात सध्या भाजपाची सत्ता असल्याने भाजपात आजी माजी पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणत गर्दी होतांना दिसून येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळविल्यानंतर भाजपच्या तालुकाध्यक्ष पदाची धुरा वडोद बाजारचे सरपंच गोविंद वाघ यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र त्यानंतर वर्षभरानंतरच गोविंद वाघ यांना आजार जडल्याने त्यांच्यावर वेळोवेळी मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून गोविंद वाघ यांची ओळख असल्याने श्री.बागडे यांनी स्वत: जातीने लक्ष देऊन उपचार केले. मात्र दोन महिन्यापूर्वी वाघ यांचे निधन झाले.

दोन महिन्यापासून तालुकाध्यक्ष पद रिक्त आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचाचे तालुकाध्यक्ष पद मिळविण्यासाठी फुलंब्री तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे समर्थक सोशल मीडियावर भावी तालुकाध्यक्ष पदी आपल्याच नेत्याची वर्णी लागावी यासाठी फेसबुक व व्हाॅटसअप च्या माध्यमातून सोशल मिडीयावर पोस्टरबाजी करतांना दिसून येत आहे. तालुक्यात खासदार आणि आमदारांनंतर सत्ताधारी पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाला मोठा मान असतो. त्यामुळे तालुकाध्यक्ष पदाच्या ठिकाणी आपलीच वर्णी लागावी अशी अनेक पदाधिकाऱ्यांची मनोमनी इच्छा आहे. परंतु कोणी कितीही सोशल मिडीयावर पोस्टरबाजी केली तरी या भागाचे आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व खासदार रावसाहेब दानवे हे ज्यांच्या डोक्यावर हात ठेऊन तोच तालुकाध्यक्ष होणार आहे. त्यामुळे सक्रीय राजकारणातून बाजूला गेलेले काही पदाधिकारीही श्री.बागडे व श्री.दानवे यांच्यासोबत विविध ठिकाणच्या कार्यक्रमात हजेरी लाऊन आपणही तालुकाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याचे दाखवून तर देत नसेल ना.. असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

तालुकाध्यक्षपदासाठी इच्छुक
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सांडू अण्णा जाधव, डॉ.सारंग गाडेकर, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, भाजपचे तालुका समन्वयक अप्पासाहेब काकडे, पंचायत समितीचे सभापती सर्जेराव मेटे,  माजी तालुकाध्यक्ष नरेंद्र देशमुख, भाजपचे तालुका उपाध्यक्ष विलास उबाळे, किनगावचे उपसरपंच कल्याण चव्हाण, सोमनाथ कोलते आदींची तालुकाध्यक्ष पदासाठी मनोमनी इच्छा आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

IPL 2024 : 'तुम्ही मला अन् धोनीला शेवटच एकत्र खेळताना...' RCB vs CSK सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

NASA Mission : पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी NASAची ध्रुवीय प्रदेश मोहिम!

Super-Rich Club: जगातील अतिश्रीमंतांची संख्या वाढली; यादीत गौतम अदानींचे कमबॅक, नंबर एक वर कोण?

Mumbai Loksabha: मुंबईची लढत का आहे इतकी इंट्रेस्टींग? वाचा संपूर्ण आकडेवारी

SCROLL FOR NEXT