blind newspaper seller in aurangabad 
मराठवाडा

VIDEO : अंध असूनही वाटतोय घरोघर वृत्तपत्रे

सुशील राऊत

औरंगाबाद : ऐन तारूण्यात दृष्टी गेली. आयुष्यात काळाकुट्ट अंधार झाला. परंतु, पत्नी आणि लहान लेकरांची जबाबदारी असल्यामुळे उपजीविकेसाठी काहीतरी करावे लागणारच. या जबाबदारीचे भान ठेऊन शेख नाहेद इतरांच्या सहकार्याने वृत्तपत्र विक्री करून उपजीविका करीत आहेत. 

शहरातील रहेमानिया कॉलनीत राहणारे शेख नाहेद शेख अफसर आठ वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यांचा एक डोळा बालपणापासूनच अधू असल्यामुळे त्यांनी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया केली. परिणामी थोडे दिवस दिसू लागले. आपणही इतरांसारखे आनंदी आयुष्य जगू, असे वाटत असतानाच काही दिवसांतच दृष्टी कमी कमी होत गेली आणि तीन वर्षांपूर्वी दोन्ही डोळे निकामी झाले. पण पत्नी आणि दोन तान्हुल्यांची जबाबदारी कशी टाळता येईल? 

नाहेदने पुन्हा उमेद धरली आणि परिचितांच्या मदतीने पुन्हा वृत्तपत्र विक्री सुरू केली. आजही ते रोज सकाळी पाच वाजता उठतात. एका मित्राच्या खांद्याचा आधार घेत घरोघरी जाऊन 120 वृत्तपत्र विकतात. यातून त्यांना महिन्याकाठी चार हजार रुपये मिळतात. त्यापैकी एक हजार सोबत येणाऱ्याला द्यावे लागतात, असे ते सांगतात.

"सध्या मी इतरांच्या खांद्याला धरून आयुष्य जगत आहे. परंतु, मित्र तरी किती दिवस साथ देतील? यासाठीच मी दोन वर्षांपूर्वी शासकीय मदत योजनेसाठी अर्ज केला. परंतु, आजपर्यंत कुठलीच मदत मिळाली नाही. माझी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने आयुष्य जगण्यासाठी किमान मदत करावी,'' अशी अपेक्षा नाहेद यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

Teacher Recruitment: शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! व्यवस्थापनाच्या वादामुळे रखडलेली शिक्षक भरती आता थेट होणार; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा..

SCROLL FOR NEXT