वडाचीवाडी (ता.भूम) ः गावात प्रथमच आलेल्या बसचे स्वागत करीत पूजन करताना ग्रामस्थ.
वडाचीवाडी (ता.भूम) ः गावात प्रथमच आलेल्या बसचे स्वागत करीत पूजन करताना ग्रामस्थ.  
मराठवाडा

वडाचीवाडीत पहिल्यांदाच लालपरीचे आगमन

सकाळ वृत्तसेवा

पाथरूड (जि.उस्मानाबाद) : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भूम तालुक्‍यातील वडाचीवाडीत सोमवारी (ता. 19) पहिल्यांदा लालपरीचे आगमन झाले. परिवहन महामंडळाने गैरसोय दूर केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.


पाथरूड परिसरतील बालाघाट डोंगराच्या कुशीत वसलेल्या वडाचीवाडी येथे स्वातंत्र्यप्राप्तीच्या अनेक वर्षांनंतरही अद्याप एसटी बस पोचली नव्हती. बससेवा सुरू नसल्याने ग्रामस्थांना खासगी वाहनाने किंवा पायी प्रवास करीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. वडाचीवाडीतील विद्यार्थ्यांना पाथरूड येथे शिक्षण घेण्यासाठी दररोज पायी ये-जा करावी लागत होती.

 
भूम आगार व युवा सेनेच्या पाठपुराव्याने वडाचीवाडी येथे सकाळी साडेआठ वाजता गिरलगाव-भूम ही पाथरूडकडे जाण्यासाठी, तर सायंकाळी साडेचार वाजता पाथरूडहून भूम-गिरलगाव अशा दोन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. आज सकाळी पहिल्यांदाच वडाचीवाडी येथे एसटी बसचे आगमन झाल्याने ग्रामस्थांनी स्वागत केले. सरपंच जालिंदर सलगर, उपसरपंच भाऊसाहेब माने व ज्येष्ठ नागरिक नवनाथ माने यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले.

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, माजी सरपंच बाबासाहेब माने, अंगद गावडे, भाऊ माने, अनिल माने, अर्जुन माने, सिदा नेरे, ब्रह्मदेव माने, ईश्वर माने, अजिनाथ वीर, रावसाहेब माने, दत्ता माने यांच्यासह शालेय विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच गावात बस आल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण होते. ग्रामस्थांकडून चालक व वाहकाचा सत्कार करण्यात आला. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT