Toilet
Toilet 
मराठवाडा

व्यापारी संकुलांमधील स्वच्छतागृहे आहेत कुठे?

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - पंधरा लाख लोकसंख्येसाठी शहरात केवळ ५५ सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याचे समोर आल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापारी संकुलांतील स्वच्छतागृहे गायब झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेकडून बांधकाम परवानगी घेताना दाखविण्यात आलेल्या स्वच्छतागृहांच्या जागा बिल्डारांनी गिळंकृत करून त्या ठिकाणी गाळे बांधून ते विक्री केले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गेलेल्या महिलांची कुचंबणा होत आहे. 

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये केवळ ५५ सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याने ‘आम्ही जायचं कुठं?’ अशा विवंचनेत महिला सापडल्या असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले आहे. 

नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यात प्रशासन कुचकामी ठरत आहे, तर दुसरीकडे प्रशासनाचा वचक नसल्याने नागरिकांना अनेक सुविधांपासून मुकावे लागत आहे. शहरात पैठण गेट, औरंगपुरा, मछलीखडक, सराफा, रंगारगल्ली, सिटी चौक, शहागंज, टीव्ही सेंटर, शिवाजीनगर, सूतगिरणी चौक, जवाहर कॉलनीसह इतर भागांमध्ये भरमसाट व्यापारी संकुले आहेत. सणा-सुदीच्या काळात बाजारपेठा गर्दीने फुलून जातात; मात्र या व्यापारी संकुलांमधील स्वच्छतागृहे गायब असून, बिल्डरांनी या जागांवर अतिक्रमण करून गाळे बांधत लाखो रुपयांची कमाई केली आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

‘शंभर रुपये द्या, कार्यालयात पाचशे लागतील’
महापालिकेने शहरात रस्त्यावर कचरा टाकणारे, कॅरिबॅग वापरणारे तसेच उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी माजी सैनिकांची नियुक्ती केली आहे. या पथकाकडून लूट सुरू झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे. एका नागरिकाने यासंदर्भात आपबिती सांगितली. समर्थनगर भागात लघुशंका करीत असताना एकाने आता पाचशे रुपयांचा दंड भरा असे आपल्याला सांगितले. थोडी हुज्जत घातल्यानंतर पावती द्या, मी कार्यालयात जाऊन पैसे भरतो, असे सांगताच संबंधित कर्मचाऱ्याने इथे पैसे दिले तर शंभर रुपये लागतील, कार्यालयात गेलात तर पाचशे रुपये भरावे लागतील, असे सांगितले. 

कारवाई करण्याचे अधिकार नागरिक मित्र पथकाला देण्यात आले आहेत; मात्र असा प्रकार घडला असेल तर त्यांच्याकडे विचारणा करण्यात येईल. 
- श्रीकृष्ण भालसिंग, अतिरिक्‍त आयुक्त.

महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये सुविधाच नाही
स्वच्छतागृहाच्या जागेवर बांधले गाळे
अतिक्रमण करणारे आता झालेत नामानिराळे
खरेदीसाठी गेलेल्या महिलांची कुचंबणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT