File photo
File photo 
मराठवाडा

‘या’ कारणाने विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास खुंटला

प्रमोद चौधरी

नांदेड : समाज घडविण्यासाठी संवेदनशील समाजाची निर्मिती होणे आवश्यक आहे; परंतु शिक्षण क्षेत्रातून ती होताना दित नाही. संस्कारीत पिढी निर्माण करण्यासाठी पूर्वप्राथमिक शिक्षणाचा ढाचा मजबूत करण्याची गरज आहे, असे मत शिक्षणक्षेत्रातील जाणकार मुख्याध्यापक व शिक्षकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

प्राथमिक शिक्षणाचा ढाचा मजबूत नसल्याने शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. शिक्षणक्षेत्राविषयीचे वैफल्याग्रस्त वातावरण व शासनाची शिक्षण क्षेत्राविषयी उदासीनता यामुळे बदलते शिक्षण हे समर्थ समाज घडवू शकत नाही. देशाने आर्थिक प्रगती साधली असली तरी तरुणांमध्ये शिक्षणानंतर मात्र वैफल्य दिसून येत आहे.


कुठल्याही समाजास उन्नत होण्यासाठी भाषा आवश्यक आहे; परंतु मातृभाषेत शिक्षण घेण्यात येत नसल्याने ज्ञानाचा प्रवाह खुंटला आहे. याउलट दक्षिण कोरियासारखा छोट्याशा देशाने आपल्या स्वतंत्र भाषेतच तंत्रज्ञानात दैदीप्यमान प्रगती केली आहे. जगाशी स्पर्धा करण्यासाठी इंग्रजी भाषा आवश्यक असली, तरी मातृभाषेतून शिक्षण देणे आज गरजेचे झाले आहे.

पूर्वप्राथमिक शाळेचा ढाचा तयार नाही. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर अद्यापही शैक्षणिक कायदा अमलात येऊ शकला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा भावनिक, शारीरिक व बौद्धिक विकास खुंटत आहे, अशी खंत शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शासनाचा शिक्षणावरील होत असलेला अपुरा खर्च, शिक्षणानंतर बेरोजगारीमुळे आलेली वैफल्यग्रस्तता, शिक्षणाबाबत मुला-मुलींमध्ये होणारा भेदभाव, शासकीय धोरण या महत्त्वाच्या बाबी आहेत. यावर शीघ्र गतीने अमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

शिक्षण पद्धती कमी पडते

कुठल्याही देशात शिक्षणाचा मूळ उद्देश हा देशातील प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित व्हावा, प्रगल्भ व्हावा हा असतो. आपल्या देशात मात्र शिक्षण क्षेत्रात प्रयोग करण्याच्या नादात शिक्षण पद्धतीवर आघात केला जात आहे. त्यामुळे समाज समर्थ करण्यास शिक्षण पद्धती कमी पडत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.                                                          - डाॅ. रामेश्वर थोरात (शिक्षणतज्ज्ञ)
 
शिक्षणावर होतो तीन टक्केच खर्च                                      प्राथमिक शिक्षणावर देशाच्या एकूण उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च व्हावा ही मागणी कोठारी कमिशन, 1986चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व 2005च्या नवीन धोरणानुसार सातत्याने होत आहे. ती अद्यापही पूर्ण करण्यात आली नाही. केवळ तीन टक्केच खर्च आज शिक्षणावर होत असल्याने दर्जेदार शिक्षणाची उणीव भासत आहे.                                - डाॅ. अरविंद पाटील (माजी मुख्याध्यापक)
 
तरच समर्थ समाज घडेल                                        अंधश्रद्धा, धार्मिक भावना, परंपरा जोपर्यंत समाजातून हद्दपार होत नाहीत, तोपर्यंत समाजामध्ये क्रियाशीलता, सर्जनशीलता तयार होणार नाही. शिक्षक, तज्ज्ञ, पालक, विद्यार्थी व समाज यांनी या कार्यात झोकून दिल्यास शिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण समाज एक सक्षम व समर्थ समाज घडण्यास वेळ लागणार नाही.                                  - सदाशीव कांबळे (सेवानिवृत्त शिक्षक)
 
ग्रामीण मुली उच्च शिक्षणापासून वंचितच                ग्रामीण भागात मुलींना शिकविण्यासाठी पालक उत्सुक नाहीत. त्याला कारणही तसेच आहेत. बहुतांश गावांमध्ये सातवीपर्यंत, चौथीपर्यंतच शाळा आहेत. त्यामुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी दूरवर जावे लागत असल्याने तसेच कुठलीही सुरक्षा नसल्याने पालक मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत. शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून एक धोरण ठरविले तर ग्रामीण भागातील सर्वच मुली उच्च शिक्षण घेऊ शकतील.                                                         - तुळशीराम कोकाटे (ग्रामस्थ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT