प्रतीकात्मक छायाचित्र.
प्रतीकात्मक छायाचित्र. 
मराठवाडा

सावधान, डेटिंगमधून होऊ शकते चिटिंग!

मनोज साखरे

औरंगाबाद - अगदी काल-परवाचीच गोष्ट. एका जवानाला मंजूळ स्वरात एकीने संपर्क साधून डेटिंगची ऑफर दिली. थापा मारून पैशांची मागणी केली. एकदा तिच्या खात्यात पैसे पडले की मग त्याच तरुणीने संपर्क तोडला अन्‌ त्या जवानांची तब्बल साडेचार लाखांची फसवणूक झाली. आपणही डेटिंग साइट्‌सवर जाताय तर सावधान! दक्ष राहा, कारण आपलाही खिसा रिकामा होऊ शकतो. 

एकलकोंडे आयुष्य जगणं असो की लालसा, उत्सुकता आणि थ्रील हे तुम्हाला संकटाकडे नेऊ शकते. प्रसंगी आर्थिक झळही पोचवू शकते. म्हणून धोक्‍याची घंटा वाजण्यापूर्वीच हा विषय समजून घेणे महत्त्वाचे आहे. हल्ली प्रत्येकजण सोशल साईट्‌सवर आहेत. अशा युजर्सचा वैयक्‍तिक डेटा मिळवला जातो. अशा काही वेबसाईट्‌स व त्यासाठी काम करणाऱ्यांची फळीच आहे. या डेटाद्वारे आपल्यापर्यंत संपर्क साधला जातो. कधी मिसकॉलही केला जातो. आपण कॉलला उत्तर दिल्यास समोरून मंजूर स्वरात महिला बोलतात. डेटिंग साईट्‌सवरून बोलत असल्याचे सांगून तुम्हाला डेटिंग करण्यासाठी भरपूर मुली आहेत. इच्छुक असल्यास मुलींची भेट घालून देण्याचेही आमिष दाखविले जाते. सुरवातीला आपण रिस्पॉन्स दिला तर परत दुसरी मुलगी डेटिंग साईट्‌सच्या नावाने संपर्क साधते. साईट्‌सवर प्रोफाईल तयार करण्याचा तुम्हाला सल्लाही दिला जातो. अर्थातच हा अधिकचा डेटा मिळविण्यासाठीचा खटाटोपही असतो.

यानंतर तुम्हाला बॅंक खात्यात पैसे भरण्याचे सांगण्यात येते. ही रक्कम कही हजारांत असते. तुम्ही एक-दोन वेळा पैसे भरले, की संपलं. मग तुम्ही कितीदाही संपर्क केला तर त्या थापा मारतात व वेळ मारून नेतात. असाच एक प्रकार शहरातील जवानासोबत घडला. त्यांचे चार लाख 47 हजार रुपये उकळण्यात आले. 
 
संशोधन होणे गरजेचे 
डेटिंग साईट कायदेशीर आहेत का, नियमात आहेत का, याचे संशोधन होणे गरजेचे आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार वेबसाईटवर कंटेट असतो का, हेही तपासून पाहण्यासाठी यंत्रणांची गरज आहे. अशा वेबसाईट किती आहेत, त्यातील फेक किती यावरही संशोधन फसव्या वेबसाईटवर कार्यवाहीची गरज आहे. 
 
अशी ओळखा वेबसाईट फेक की खरी 

  • वेबसाईटला http नंतर s लागलेले असते, तसे नसेल तर ती फेक समजावी. 
  • माहिती तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय संघटनेच्या नॉर्मनुसार सेक्‍युराईड लॉक आयकॉन असतो, फेक साईटला आयकॉन नसतो. 
  • डोमेन नेम, डोमेन एज बघावे, व्याकरणाच्या चुका, स्पेलिंग तपासून पाहावे. 
  • कॉन्टॅक्‍ट ऍड्रेसमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करावे, गुगल मॅपवर जाऊन पाहावे. 
  • प्रायव्हसी लीगल पॉलिसी तपासून बघावी. 
  • अबाऊट इन्फोमध्ये जाऊन वेबसाईटमागे कोण आहे याची खात्री करावी. 
  • वेबसाईट विविध सर्च इंजिनवरही शोधावी. 
  • सोशल मीडिया उदा. फेसबुक, इन्स्टाग्रामवरही सर्च केल्यास वेबसाईटबद्दल खात्री होते. 

ज्या व्यक्तीला आपण भेटलोच नाही त्याच्याशी आर्थिक व्यवहार करणे धोक्‍याचेच. डेटिंग साईटला व्हिजिट करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे; परंतु फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावीच लागेल. समोरील व्यक्ती आपल्याकडून कशाची अपेक्षा करते, याचा विचार करा. शक्‍यतो अशा गोष्टींपासून दूर राहिलेलेच बरे. वेबसाईटची सत्यता पडताळा. 
- राहुल खटावकर, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT