खासदार, आमदारांनी घेतली संत बाबा बलविंदरसिंघजी यांची भेट 
मराठवाडा

नांदेडला पंजाबहून आलेल्या यात्रेकरुंचा प्रवासाचा मार्ग मोकळा...

अभय कुळकजाईकर

नांदेड - मुख्य सचखंड गुरुद्वारा येथे हल्ला महल्ला या पारंपारिक उत्सवासाठी पंजाब, हरियाणासह इतर राज्यामधून आलेल्या व नांदेड येथे गेल्या महिनाभरापासून लॉकडाउनमध्ये अडकलेल्या जवळपा तीन हजार यात्रेकरुंच्या प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या प्रवासाचा मार्ग मोकळा झाला असून, गुरुवारी (ता. २४) ते ट्रॅव्हल्सव्दारे रवाना होणार आहेत.

खासदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. हल्ला महल्ला या पारंपारिक उत्सवासाठी पंजाब, हरियाणासह इतर राज्यातून शीख यात्रेकरु आले होते. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांना त्यांच्या गावी परत जाता येत नव्हते. याबाबत आम्ही दोघांनीही सातत्याने मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या प्रवासासंदर्भात व त्यांना त्यांच्या गावी प्रस्थान करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर त्यास यश मिळाले आहे. 

प्रवासाची दिली परवानगी 
याबाबतचे निवेदन देखील त्यांना पाठवून दूरध्वनीवर त्यांच्याशी सातत्याने बोलणेही चालू होते. आज बुधवारी अखेर या मागणीला यश आले असून, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या प्रवासाची परवानगी देवून त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्वतः लंगर साहिब गुरुव्दाराचे बाबा बलविंदरसिंघजी यांनी देखील आमच्याकडे मागणी करुन मुख्यमंत्र्यांना याबाबत अवगत करा, अशी मागणी केली होती. अखेर ३० दिवसानंतर या मागणीला यश आले असून, उद्या गुरुवारी हे यात्रेकरु विशेष ट्रॅव्हल्सव्दारे आपल्या गावी रवाना होणार आहेत.


खासदार, आमदारांनी घेतली भेट
खासदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांनी संत बाबा बलविंदरसिंघजी व यात्रेकरुंची भेट घेवून त्यांना मुख्यमंत्र्यांचा निरोप पोहचता केला. ही बातमी ऐकल्यानंतर संत बाबा बलविंदरसिंघजी यांनी आनंद व्यक्त केला तसेच यात्रेकरुंनी देखील समाधान व्यक्त केले. लंगर साहिब गुरुव्दाराच्या वतीने गेल्या महिनाभरापासून नांदेड शहर व परिसरातील अडकून पडलेल्या यात्रेकरुंना तसेच इतर गोरगरीबांना अन्नदान करुन नांदेडकरांची सेवा केल्याबद्दल खासदार पाटील आणि आमदार कल्याणकर यांनी त्यांचे आभार मानले.

नांदेडला प्रयोगशाळेला शासनाची मान्यता
खासदार हेमंत पाटील आणि नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंक्युबेशन केंद्रामध्ये कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळेला मान्यता द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती तसेच पाठपुरावा केल्यामुळे प्रयोगशाळेला मान्यता मिळाली असून, या परिसरातील कोविड - १९ च्या कोरोना विषाणू संसर्गाच्या  चाचण्या दररोज करता येतील, असेही पत्रात म्हटले आहे. महिनाभरापूर्वीच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात कोरोना विषाणू संसर्गाची प्रयोग शाळा सुरु करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. ती त्यांनी मान्य करुन त्याचा प्रस्ताव अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर यांच्याकडे पाठविला आणि पाठपुरावा करुन त्याला मान्यता दिली. त्याबद्दल आम्ही दोघांनीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यापीठात जाऊन या केंद्राची पाहणी करुन माहिती घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon: माॅन्सूनची अजून पाच दिवसांची प्रतीक्षा! राज्यात ७२ टक्के कमी पावसाची नोंद, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस

आजचे राशिभविष्य - 16 जून 2026

Moong Dal Palak Idli Recipe: प्रोटीन आणि आयर्नचा भरपूर खजिना; नाश्त्यासाठी बनवा मऊ अन् स्पंजी 'मूग डाळ-पालक इडली'

16 जून 2026 पंचांग! चंद्रदर्शन, त्रिपुष्कर योग आणि शुभ मुहूर्तांची माहिती

अस्थिबोध : गरम पाण्याची पिशवी की बर्फ?

SCROLL FOR NEXT