Devendra Fadnavis
Devendra Fadnavis 
मराठवाडा

भविष्यात वंचित आघाडीकडे विरोधीपक्षनेतेपद : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नारायण राणे हे भाजपचेच खासदार असून, ते भाजपमध्येच आहेत. पक्ष विलीनीकरणाबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेऊ. भविष्यात मला वाटतेय, की विरोधी पक्षनेता हा बहुजन वंचित आघाडीचा असेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नांदेडमध्ये असून, त्यांनी पत्रकार परिषदेत मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीबद्दल वक्तव्ये करत विरोधकांवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेचा समारोप सोलापुरात 1 सप्टेंबरला होणार आहे. 

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, की मराठवाड्यात वॉटर ग्रीड महत्त्वाकांक्षी प्रकल्प गरजेचे आहे. 102 टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळवून देणार आहे. कोकणातून वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी लिफ्ट करुन ते मराठवाड्यात आणणार आहोत. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यास या योजनेची मदत होणार आहे. नारायण राणे भाजपमध्ये आहेत. पक्ष विलीनीकरण चर्चा बाकी आहे, त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. भविष्यात विरोधी पक्षनेता वंचितचा असेल काँग्रेसचा नाही. पवारांची राष्ट्रवादी आता फक्त महाराष्ट्रापुरती राहिली आहे. 

अशोकाच झाड नुसतच उंच वाढते
मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. अशोकाचं झाडं नूसतंच उंच उंच वाढतं मात्र,  ते झाड कुणालाही सावली देत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नांदेडकरांनी नवीन सावली शोधली आणि एक नवा इतिहास तयार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT