Athletics 
मराठवाडा

स्पर्धेला आलेल्या मुलांकडून ‘हमाली कामे’

सुशील राऊत

औरंगाबाद - विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या विभागीय आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये आलेल्या स्पर्धक खेळाडूंनाच ‘हमाली कामे’ करण्यासाठी जुंपण्याची असंवेदनशीलता आयोजकांनी दाखविली. प्रमुख पाहुणे मैदानावर दाखल होण्यापूर्वी मुलांनाच संकुलातील खुर्च्या उचलण्याच्या कामाला लावण्यात आले.

गेल्या पाच दिवसांपासून विभागीय क्रीडा संकुलात आश्रमशाळेच्या मुलांची विभागीय स्पर्धा सुरू होती. शनिवारी (ता. सहा) या स्पर्धेचा समारोप झाला. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी चारची दिलेली असताना पाहुण्यांचे आगमन मात्र प्रत्यक्षात साडेपाचला झाले. ते येण्यापूर्वी स्पर्धेच्या आयोजक मंडळाने मुलांकडून हमाली कामे करून घेतली. 

व्यासपीठावरून सूत्रसंचालनासाठी उपस्थित मास्तरांनी मुलांना फर्मान सोडण्याचा सपाटा लावत मुळात आयोजकांकडून करावयाची कामे या विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली. खेळून दमलेल्या मुलांना मात्र सांगितलेले काम पूर्ण करण्यासाठी पळावे लागले. ही मुले मैदानावर अस्ताव्यस्त पडलेल्या खुर्च्या उचलण्यासाठी पळाली आणि आपल्या ओझ्यापेक्षा अधिक अशा चार-चार खुर्च्या धापा टाकत उचलून आणल्या.

विभागीय आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचा समारोप
औरंगाबाद - शिक्षण हे फक्त पुस्तकी नसावे. ते मानसिकदृष्ट्या पोषक असावे. भरपूर खेळा, मोठे व्हा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी केले. विभागीय क्रीडा संकुलात आयोजित विभागीय आंतरआश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचा त्यांच्या हस्ते शनिवारी (ता. पाच) समारोप झाला. या वेळी त्या बोलत होत्या. 

अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावतीतर्फे आयोजित शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा विभागीय क्रीडा संकुल येथे शनिवारी (ता. पाच) पार पडला. यशस्वितेसाठी अमरावती प्रकल्प अधिकारी विनिता तायडे, अशोक गिरी, प्रा. एकनाथ साळुंके, नागनाथ कराड, माणिक राठोड, गोविंद शर्मा, मयूर मुंढे, राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पुसद, अकोला, किनवट, पांडकवडा येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Latest Marathi News Live Update : परभणीत इंस्टाग्राम स्टोरीवरून तरुणाला मारहाण

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

Investment Planning: गुंतवणुकीत एक्झिट स्ट्रॅटेजी नसलेल्या गुंतवणूकदारांवर का येते पश्चात्तापाची वेळ?

SCROLL FOR NEXT