Paithab Pandharpur Highway
Paithab Pandharpur Highway  sakal
मराठवाडा

Paitha Pandharpur Highway : पैठण-पंढरपूर मार्ग त्वरित पूर्ण करा ; खंडपीठात याचिका ,केंद्रासह प्रतिवादींना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : प्रलंबित पैठण-पंढरपूर पालखी राष्ट्रीय मार्ग लवकर करण्यात यावा, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल झाली आहे. न्या आर. व्ही. घुगे, न्या. आर. एम. जोशी यांनी केंद्र सरकारसह सर्व संबंधित प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी २ मे रोजी अपेक्षित आहे.

याचिकेनुसार, पैठण-पंढरपूर पालखी मार्ग २०१७ रोजी राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित होऊन सदरील कामाच्या निविदा निघून काम सुरू करण्यात आले होते. सदरील ७५२ राष्ट्रीय महामार्ग पैठण मुंगी, बोधेगाव, घोणसपारगाव, उखंडाचकला, बीड, सांगवी शिरूर कासार, राक्षसभुवन, खोल्याचीवाडी, कारेगाव, डोंगरकिन्ही, चुंबळी, पाटोदा पारगावघुमरा, दिघोळला जोडला जाऊन पुढे तो खर्डा मार्गे पंढरपूरकडे जाणार आहे. सदरील मार्गाचे काम सुरू होऊन सात वर्षे झालेली आहेत. परंतु, अनेक ठिकाणी रोडचे कामे अपूर्ण स्थितीत पडलेले आहे. रोड खोदल्यामुळे लोकांना धुळीचा व खड्ड्यांचा त्रास होत आहे.

पाटोदा येथील नागरिक महादेव नाना नागरगोजे तसेच रामकृष्ण गणपतराव रंधवे, चक्रपाणी लक्ष्मणराव जाधव यांनी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन हे काम लवकर करावे, अशी विनंती केली होती. यामुळे लोकांचे अतोनात हाल होत असल्यामुळे या तिघांनी अ‍ॅड. नरसिंह ल. जाधव यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी अ‍ॅड. नरसिंह जाधव यांना अ‍ॅड. राकेश ब्राह्मणकर यांनी सहकार्य केले.

हे आहेत प्रतिवादी

याचिकेत रस्ते, परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय दिल्ली, रेल्वे सचिव नवी दिल्ली, सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे सचिव, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता (छ. संभाजीनगर), माजलगावचे रा.म.प्रा.चे उपविभागीय सहायक अभियंता, रा.म.प्रा.चे प्रकल्प संचालक, रा.म.चे प्रादेशिक अधिकारी आणि मुख्य अभियंता, नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक, नगर येथील मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता (बांधकाम) यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT