Born-Baby
Born-Baby 
मराठवाडा

जालन्यात बाळाची अदलाबदल

सकाळवृत्तसेवा

जालना - येथील महिला व बाल रुग्णालयात एका आईने गोंडस बाळाला जन्म दिला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांना मुलगा झाल्याचे सांगितले खरे; मात्र प्रसूतीनंतर बाहेर आल्यानंतर आईसोबत मुलगी असल्याचे निदर्शनास आले अन्‌ एकच गोंधळ उडाला. दरम्यान, परिचारिकेकडून बाळाची नोंद करताना चूक झाल्याचे सांगितले जात असले, तरी बाळाची अदलाबदल झाल्याची शंका उपस्थित केल्यामुळे आई व बाळाची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जाफराबाद येथील तरनूम शेख (वय 19) यांना रविवारी सायंकाळी साडेसहाला महिला व बाल रुग्णालयात दाखल केले. काही मिनिटांतच त्यांनी बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर बाळाची रजिस्टवर नोंद करताना मुलगीऐवजी मुलगा अशी नोंद करीत नातेवाइकांनाही मुलगा झाल्याचे परिचारिकेने सांगितले; मात्र अर्ध्या तासानंतर आईकडे सोपविलेले बाळ मुलगी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला.

रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेंद्र पाटील व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी प्रकरणाची चौकशी केली असता परिचारिकेकडून चुकीची नोंद झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. पोलिस तक्रारीनंतर नातेवाइकांनी बाळासह आईची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार मंगळवारी (ता. 19) डीएनए चाचणीसाठी बाळ व आईच्या रक्ताचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT