संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

'उसको तो खतम करूंगा' म्हणत कुऱ्हाडीने वार करून केला खून 

मनोज साखरे

औरंगाबाद - आई, बहिणीला शिवीगाळ केल्यावरून झालेल्या भांडणाचा वचपा काढीत शेजारी राहणाऱ्यांनी बांधकाम कंत्राटदाराच्या डोक्‍यात कुऱ्हाडीने जोरदार घाव घातले. या हल्ल्यात कंत्राटदाराचा मृत्यू झाला. ही गंभीर घटना बुधवारी (ता. 31) रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास शहानूरमियॉं दर्गा परिसरात घडली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शेख सुभान शेख अमीर (37, रा. शम्सनगर, उस्मानपुरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी शेख नईम ऊर्फ गोरू शेख सलीम (वय 25) याला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. बांधकाम कंत्राटदार शेख सुभान यांचा मुलगा आसेफ याची शहानूरमियॉं दर्गाजवळ चहाची टपरी आहे.

बुधवारी रात्री सुभान रमजानी हॉटेल येथे मित्र अब्दुल सत्तारसोबत चहा घेत होते. त्यावेळी शेख नईम, शेख अलीम शेख सलीम ऊर्फ बच्चू, शेख समीर शेख सलीम हे तिघे भाऊ हॉटेलमध्ये आले. त्यातील गोरूने सुभान यांच्या डोक्‍यात मागून येत कुऱ्हाडीने दोन जोरदार घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात सुभान यांना पाहून परिसरातील नागरिकांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र रात्री दोनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खुनानंतर कायदा व सुव्यवस्थेला तडा जाऊ नये म्हणून दंगाकाबू पथकाला पाचारण करण्यात आले होते. 

याप्रकरणी सुभान यांचे भाऊ शेख शकील यांनी तक्रार दिली. त्यानुसार शेख नईम, शेख अलीम, शेख समीर व त्यांच्या आईविरुद्ध खुनाच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली.  सुभान व शेख परिवार एकमेकांच्या घरासमोर राहतात. महिनाभरापूर्वी लहान मुलांच्या खेळण्यावरून दोन्ही कुटुंबीयांत वाद झाला. त्यावेळी सुभान यांनी गोरूच्या आईला व बहिणीला शिवीगाळ केली होती. हा वाद पोलिस ठाण्यातही गेला होता. त्यानंतर आई-बहिणीला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सुभानवर अदखलपात्र गुन्हाही नोंद झाला होता. यानंतर "उसको तो खतम करूंगा' अशी शपथच संशयिताने घेतली होती.

अम्मा की कसम पुरी की
सुभान यांच्यावर हल्ला करून गोरू, बच्चू व शेख समीर पसार झाले. तत्पूर्वी गोरूने सुभानवर घाव घालताच "अम्मा की कसम तुने पुरी की' असे बच्चू गोरूला म्हटल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच संशयित गोरू नेहमी नशापान करीत होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

SCROLL FOR NEXT