मराठवाडा

कोरोनाग्रस्त वाढू नयेत हीच प्रार्थना 

हरि तुगावकर


लातूरः निलंगा येथे परराज्यातून आलेल्या बारापैकी आठ जणांचे स्वॅबचे नमुने पॉझिटीव्ह आल्यानंतर लातूर जिल्हा हादरला आहे.आता पण खरी परिक्षा येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांची आहे. कारण त्यांना या उपचार करण्यासाठी सतत या रुग्णांच्या संपर्कात रहावे लागणार आहे.

आम्ही या रुग्णांना बरे तर करूच ते आमचे काम ही आहे, पण या रुग्णांच्या संपर्कात आलेले कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू नये हीच देवाला प्रार्थना आहे, अशा भावना रविवारी (ता. ५) या डॉक्टरांनी `सकाळ`शी बोलताना व्यक्त केल्या. 

कोरोना कोविड-१९ विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना केल्या जात आहेत. यात येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत स्वतंत्र कोरोना उपचार कक्ष स्थापन करण्यात आला आहे. डॉ. मारुती कराळे यांच्या नेतृत्वाखाली तीन शिफ्टमध्ये डॉक्टर व परिचारिका अहोरात्र काम करीत आहेत. आतापर्यंत पाच हजार जणांची तपासणी करण्यात आली आहे. रविवारी देखील ७० व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. 

आतापर्यंत १०५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणु संस्था, पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी शनिवारी (ता. चार) १४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सर्वच १४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. आजपर्यंत एकूण २९ व्यक्तींचा होम क्वारन्टाईन्ड कालावधी संपला आहे. इतर ५७ व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत होम क्वारन्टाईन्ड मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच १२ व्यक्तींना या संस्थेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ८ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आहे. इतर ७ व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. 

निलंगा येथे हरियानातून आलेल्या १२ पैकी आठ व्यक्तींचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. लातूर जिल्हाच हादरला. साहजिकच गेली काही दिवस काम कोरोना कक्षात काम करणाऱया डॉक्टर व परिचारिकासाठी देखील शॉकिंगच न्यूज ठरली. मनात कोणतीही भिती न बाळगता डॉ. कराळे व त्यांचे सर्व सहकारी या कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार करीत आहेत. या सर्वांना आम्ही बरे करूच असे सांगत यांच्या संपर्कात आलेल्या नागरीक कोरोनाग्रस्त असू नयेत अशा भावनाही ते व्यक्त करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT