Latur News
Latur News 
मराठवाडा

कोरोनाची तपासणी करूनच कैद्यांना कारागृहात प्रवेश

हरी तुगावकर

लातूर : कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. यात कारागृह प्रशासनही मागे नाही. येथील जिल्हा कारागृहात असलेल्या कैद्याची काळजी घेण्यासोबतच कारागृहात नवीन येणाऱया कैद्यांची कोरोनाची तपासणी करूनच आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. इतकेच नव्हे तर या बाहेरून येणाऱया नवीन कैद्यांना वेगळ्या कारागृहात वेगळ्या ठिकाण ठेवण्यात येत आहे.

येथील साई रस्त्यावर जिल्हा कारागृह आहे. राज्यात वर्ग एकमध्ये मोडणारे हे कारागृह आहे. वेगवेगळ्या सुविधा या कारागृहात आहेत. साधे कैदी, मोठ्या गुन्हयातील कैद्यांची स्वतंत्र व्यवस्थाही या कारागृहात आहे. सध्या या कारागृहात वेगवेगळ्या गुन्हयातील ३४५ कैदी आहेत. गेल्या काही दिवसापासून कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत चालल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे. कसा कोठून कोणाच्या माध्यमातून या संसर्गाची लागण होईल हे सांगणेही कठीण आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यामुळे या जिल्हा कारागृहातील ३४५ कैद्यांची सुरक्षितेची मोठी जबाबदारी कारागृह प्रशासनाला पार पाडावी लागत आहे. या कैद्यांसाठी नाशिक कारागृहातून मास्क मागवण्यात आले आहेत. तसेच एका खासगी संस्थेनेही कारागृहाला मास्कचा पुरवठा केला आहे. कैद्यांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कैद्यांना वारंवार हात धुण्यासाठीही सांगितले जात आहे. या कैद्याची वैद्यकीय अधिकाऱयांमार्फत वारंवार वैद्यकीय तपासणीही केली जात आहे.

यात बाहेरून येणाऱया कैद्यावर कारागृह प्रशासनाची बारीक नजर आहे. बाहेरून येणाऱया एखाद्या कैद्याला कोरोनाचा संसर्ग असेल तर आतमधील कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेवून आता बाहेर येणाऱया कैद्यांची विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात कोरोनाची तपासणी करूनच त्यांना कारागृहात प्रवेश दिला जात आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

राज्यात विविध कारागृहात असलेले लातूर जिल्ह्यातील काही कैदी आहेत. ते सध्या रजेवर लातूर जिल्ह्यात आलेले आहेत. ज्यांची रजा संपलेली आहे अशा कैद्यांना लॉकडाऊऩमुळे आता परत त्या त्या कारागृहात जाता येत नाही. अशा कैद्यांना याच कारागृहात ठेवण्यात येत आहे. त्यांना देखील कारागृहात घेण्यापूर्वी कोरोनाची तपासणी केली जात आहे. एकूणच कारागृह प्रशासन याकडे गांभिर्याने पाहताना दिसत आहे.

लातूर जिल्हा कारागृहात सध्या ३४५ कैदी आहेत. त्यांच्यात एकमेकात सुरक्षित अंतर ठेवण्यात आलेले आहे. त्यांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आलेले आहे. त्यांची वैद्यकीय अधिकाऱय़ांकडून तपासणीही करण्यात येत आहे. बाहेरून येणाऱया कैद्यांचीच जास्त काळजी आहे. त्यामुळे त्यांची कोरोनाची तपासणी करूनच त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. नवीन येणाऱय़ा कैद्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. कोरोना रोखण्यासाठी आम्ही सर्व उपाय योजना करीत आहोत.
- मधुकर चौधरी, प्रभारी तुरुंग अधिक्षक, लातूर

Coronavirus Test Compulsory For Prisoners Maharashtra Latur News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT