Coronvirus Affects Marriages Latur  
मराठवाडा

लग्नाच्या बैठकीतच जोडप्याने म्हटले ‘कबुल हैं’, कोरोनामुळे कुटुंबीयांचा निर्णय

सुशांत सांगवे

लातूर : लग्न सोहळा म्हटले की काही ठिकाणी शेकड्याच्या तर काही ठिकाणी हजारांच्या घरात गर्दी पहायला मिळते. पण, केवळ 15 जणांच्या उपस्थितीत एक विवाह सोहळा संपन्न झाला. ‘कोरोना’चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लातूरातील सय्यद कुटूंबाने हा कौतूकास्पद निर्णय घेतला. तर दुसरीकडे, शहरातील मध्यभागातील अंजनी हॉटेलला नोटीस पाठवून तेथे होणारे दोन विवाह सोहळे पोलिसांनी गुरूवारी रद्द करायला लावले.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करू नका, असे आवाहन विविध स्तरातून केले जात आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसादही मिळताना दिसत आहे. जात-धर्म न पाहता प्रत्येकजन कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी मानसिकरित्या सज्ज झाला आहे. याच पार्श्वभूमीवर लातूरातील सय्यद कुटुबांना अतिशय साधेपणाने आणि तेही लग्न तारीख ठरविण्याच्या बैठकीतच मुलाचे लग्न लावून देत नवा आदर्श घालून दिला आहे.

मोहम्मद मजहर हूसेन हे उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या मोहम्मद इक्बाल हुसेन या मुलासाठी त्यांनी अहदमपूरमधील एक स्थळ पाहीले. मुलगी आवडली. त्यानंतर लग्नाची तारीख ठरविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत दोन्हीकडील 15 कुटूंबिय आणि नातेवाईक उपस्थित होते. बैठकीत ‘कोरोना’चा विषय निघाला. हा आजार देशात आणि तोही महाराष्ट्रात झपाट्याने पसरत आहे. त्यातील गांभीर्य पाहून सय्यद कुटूबांने बैठकीत निकाह लावण्याचा मुद्दा मांडला. तो सर्वांनाच आवडला. लग्नाची तारीख ठरविण्यासाठी गेलेल्यांनी परत येताना निकाह लावून सोबत वधूलाच आणले. या निर्णयाचे अनेकांनी कौतूक केले. या वेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईज शेख, ॲड. झहिरोद्दीन सय्यद, प्रा. फसियोद्दीन सिद्दीकी, माजी उपनगराध्यक्ष कलीम सिद्दीकी उपस्थित होते.

दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या वतीने दोन विवाह सोहळे अंजनी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले होते. हा समारंभ आज (ता. 19) सायंकाळी सहा वाजता आयोजिण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी माहिती समजताच त्यांनी अंजनी हॉटेलला नोटिस पाठवून गर्दी जमवल्यास कारवाई होईल, असे सांगितले. याला शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक एन. व्ही. लाकाळ यांनी दुजोरा दिला. पोलिसांच्या नोटीसीनंतर हे विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhas River: धोक्याची घंटा! उल्हास नदीने गाठली इशारा पातळी; कल्याण-डोंबिवलीकरांवर पुराचे संकट, प्रशासनचा हाय अलर्ट

Driving Licence Rules : ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नियम बदलणार; बाईक, टॅक्सीसाठी १ ऑगस्टपासून अंमलबजावणीची शक्यता

Latest Marathi News Live Update : लातूरच्या चाकूर तालुक्यात स्कूलबस उलटली, १५ विद्यार्थी जखमी

Gold Rate Today: सलग 5व्या दिवशी सोनं स्वस्त! 18 कॅरेट 1.08 लाखांवर; 22k आणि 24k सोनं किती रुपयांना?

Mumbai Heavy Rain : पावसााचा फटका! सलग चौथ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; नेरळ-भिवपुरी रेल्वे रुळांवर पाणी, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT