crime
crime 
मराठवाडा

औरंगाबाद : टँकर चालकाला चौघांनी मारहाण करत लुटले 

योगेश पायघन

औरंगाबाद : बीड बायपास रस्त्यावर टॅंकर चालकाला चौघांनी मारहाण करत लुटले. हि घटना रेणुका माता कमान परिसरात शुक्रवारी (ता. नऊ) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. भेदरलेल्या रक्तभंबाळ चालकाने टॅंकर पुढे नेत नाकाबंदीवरच्या पोलीसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलीसांनी तात्काळ पाठलाग केल्याने चारही लुटारुंना अटक केली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, भांडेगाव (जि. यवतमाळ) येथील ट्रॅंकर चालक राजेश तांडेकर हे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास कारंजा येथुन बीडबायपासमार्गे मुंबईकडे जात होते. त्यावेळी रेणूकामाता कमानीजवळ 4 जणांनी टॅंकर अडवून राजेश यांना मारहाण करत त्याच्याकडुन बळजबरीने 1 हजार 600 रूपये काढून खिश्‍यातुन काढुन घेतले. भेदरलेल्या ट्रकचालकाने तसाच टॅंकर पुढे नेला नाकाबंदीवर असलेल्या सातारा पोलीसांना हा प्रकार सांगितला.

पोलिस उपनिरीक्षक सुशीला खरात, कर्मचारी मरकड, व्ही. एन. सनान्से, एस. बी चव्हाण, एच. के. बहुरे यांनी लुटारुंचा पाठलाग करून चौघांना पकडले. त्यांना ट्रक चालकासमोर आणले तेव्हा त्यांनी लुटारुंना ओळखले याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात पकडलेल्या राजू सुधाकर सोनवणे (वय 31,रा.अर्थनगर), वृद्धेश्वर मधूकर गिरी (वय 19,रा.संग्रामनगर), नजीर निजामोद्दीन शेख (वय 24,रा. संग्रामनगर), संदीप जयसिंग बरथुने (वय 27, रा.हायकोर्ट कॉलनी) या संशयीतांवर जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT