बीड - जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांत मुलींना मार्गदर्शन करताना दामिनी पथकातील सदस्य.
बीड - जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांत मुलींना मार्गदर्शन करताना दामिनी पथकातील सदस्य. 
मराठवाडा

अडीच हजार मजनूंवर कारवाया

जालिंदर धांडे

बीड - जिल्ह्यातील महिला व मुलींवरील छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या पुढाकाराने जिल्ह्यात १२ दामिनी पथक निर्माण करण्यात आली आहेत. या पथकाने वर्ष २०१८ मध्ये दोन हजार ६८४ रोडरोमिओंना चोप दिला आहे. यातील १५३ जणांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. बाकीच्यांना अधिकाऱ्यांनी ताकीद दिल्या आहेत.

जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांत जाऊन मुलींशी संवाद साधून त्यांना दामिनी पथक मार्गदर्शन करत आहे. महिला व मुलींसाठी दामिनी पथकामार्फत मोबाईल व हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात महिला व मुलींची छेड काढण्याच्या घटनांत वाढ होत आहे. वर्ष २०१८ मध्ये जिल्ह्यात छेडछाडीच्या दोन हजार ६८४ घटना घडल्या. यामधील १५३ रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली. बाकीच्यांना अधिकाऱ्यांनी चांगला चोप दिला आहे. वर्षभरात रोडरोमिओंवर करण्यात आलेल्या कारवायातून ९२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील मुली व महिलांवरील छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १२ दामिनी पथके चांगल्या प्रकारे काम करत आहेत. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक भरत माने, एस.एस.गर्जे, रंजना सांगळे, रमा भालेराव, गणपत पवार, श्री. शिंदे यांनी कारवाया केल्या आहेत. 

दामिनी पथकांच्या शाळा-महाविद्यालयांना भेटी
जिल्ह्यातील १२ दामिनी पथकांच्या माध्यमातून वर्ष २०१८ मध्ये शाळा-महाविद्यालयांना दोन हजार ८३१ वेळा भेटी देण्यात आल्या आहेत. मुलींशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करण्यात येते. महिला बचतगटांनाही पथकाच्या माध्यमातून ५७९ वेळा भेटी देण्यात आल्या. पोलिस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक, पोलिस उपनिरीक्षक स्वाती लामखडे, ललित कुमार साळवे, किशोर राऊत, जयश्री नरवडे, कल्पना चव्हाण, उज्ज्वला जोगदंड, पांडुरंग दराडे, शमीम पाशा हे मार्गदर्शन करत आहेत.

महिला व मुलींसाठी हेल्पलाइन नंबर
महिला व मुलींची कुणी छेडछाड करत असेल तर दामिनी पथकाच्या मोबाईल नंबर ७७४१०९१००० तर हेल्पलाइन नंबर १०१९ यावर तक्रार केल्या जातात. तक्रार देणाऱ्याचे नाव गुपीत ठेवण्यात येते.

जिल्ह्यातील छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी आम्ही पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. जिल्ह्यातील महिला व मुलींना काही अडचणी येत असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधवा.
- भरत माने, पोलिस उपनिरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT