crime news in beed
crime news in beed crime news in beed
मराठवाडा

Beed Crime: केज तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांत वाढ

सकाळ वृत्तसेवा

केज (बीड): तालुक्यात मागील दीड-दोन वर्षांपासून घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येवरून दिसून येत आहे. सध्या शहर व ग्रामीण भागात अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर अपेक्षित असणारा पोलिस प्रशासनाचा वचक राहिला दिसत नाही. परिणामी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष केंद्रित करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना कडक आदेश देण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्याने तालुक्यात घडणाऱ्या गुन्ह्यात घट होणे गरजेचे होते. मात्र तालुक्यात याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी केज पोलिस उपअधीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या केज, युसुफवडगाव व धारूर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हाती आहे. मात्र शहरात व ग्रामीण भागात अवैधरीत्या चालणाऱ्या धंद्याकडे व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांकडे पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे सोईस्कररीत्या दुर्लक्ष होत असल्याने गुन्ह्यांत वाढ झाली आहे.

सध्या पोलिस ठाण्याजवळ व शहरातील मुख्य रस्त्यालगत तर ग्रामीण भागात अवैध दारू विक्री, मटका व पत्त्यांचे जुगार अड्डे राजरोस सुरू आहेत. याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चालली आहे. महिला अत्याचार, विनयभंग, मारहाण, मुलींची छेड व पळवून नेण्याचा घटनांसह चोरी, खून व वाटमारीच्या घटनांत वाढ झाली आहे. यावरून पोलिस प्रशासनाचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवरचा वचक कमी झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊन जनतेची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी संबंधित पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना कठोर सूचना द्याव्यात. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT