17-year-old girl was abducted by her boyfriend in jalna
17-year-old girl was abducted by her boyfriend in jalna sakal
मराठवाडा

Crime News : अल्पवयीन मुलीने प्रियकरासोबत ठोकली धूम ; महिला राज्यगृहात पालकांकडे सोपविण्यापूर्वीच प्रकार

राजेश नागरे

जालना : शासकीय महिला राज्यगृहातील अल्पवयीन मुलगी शासकीय अधिकाऱ्यासह आई-वडिलांसमोर प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना सोमवारी (ता.एक) दुपारी घडली. या प्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबड तालुक्यातील १७ वर्षे ११ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी बाल कल्याण समितीच्या आदेशाने महिला राज्यगृहात दाखल झाली होती. या मुलीने जिल्हा परीविक्षा अधिकारी तथा शासकीय महिला राज्यगृहाचे अधीक्षक यांच्याकडे आपणास आई-वडिलांकडे सोपवावे यासाठी अर्ज केला होता.

या अर्जाच्या अनुषंगाने अधीक्षकांनी मुलीच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. बालकल्याण समितीच्या उपस्थितीमध्ये सोमवारी मुलीस आई-वडिलांकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू होती. त्याच दरम्यान सर्वांची नजर चुकवीत जवळच उभ्या असलेल्या प्रियकरासोबत ही अल्पवयीन मुलगी दुचाकीवरून पसार झाली. या प्रकरणी अधीक्षकांच्या तक्रारीवरून तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रमेश जायभाय यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT