मराठवाडा

‘ या ’ जिल्ह्यात ‘ इतके ’ दिवस जमावबंदी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड:  आयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था आबाधीत रहावी, यासाठी जिल्हा दंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी शनिवार (ता. नऊ) ते ता. २२ नोव्हेंबर या १४ दिवसाच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात फौजदारी प्रक्रीया संहिता १९७० चे कलम १४४ लागू केले अाहे. या कालावधीत पाच पेक्षा अधीक लोकांना एकत्र येण्यासह इतर निर्बंध लावण्यात आले अाहेत.

बहूप्रतिक्षीत आयोध्या येथील राम जन्मभुमीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा शनिवारी (ता. नऊ) निकाल लागला. या निकालाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना अहवाल पाठविला होता. यात निकालाच्या पार्श्‍वभूमी समाजात त्याची प्रक्रीया उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली होती. निकालानंतर काही उत्साही लोक चौका- चौकात एकत्र येवून रॅली काढून गुलाल उधळणे, फटाके वाजवुन आनंद व्यक्त करताना इतर समाजाच्या भावणा दुखावुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण हाेवून शकतो. यामुळे सामान्यांना घराबाहेर पडणे धोक्याचे होवु शकते. यामुळे जमावबंदी आदेश लागु करण्याची विनंती केली होती. यामुळे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शनिवारी (ता. नऊ) संपूर्ण जिल्ह्यात फौजदारी प्रक्रीया संहिता १९७० चे कलम १४४ (२) अन्वये आदेश पारीत केले. 

यामुळे जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा अधीक लोकांनी एकत्र जमु नये, निकालानंतर कोणत्याही समाजाच्या भावणा दुखावतील अशा प्रतिक्रिया समाज माध्यम, वृत्तपत्र, होर्ल्डींग आदीवर प्रसारीत करु नये, तसेच गुलाल उधळू नये, फटाके वाजवू नये, साखर, पेठे मिठाई वाटू नये व मिरवणुका रॅली काढू नये. निकालाबाबत भाषणबाजी, घोषणाबाजी, जल्लोष करु नये, जूने व्हीडीओ व फोटो प्रसारीत करु नये, महाआरती, समुहपठण, धर्मपरीषदांचे आयोजन करु नये, या कालावधीत रॅली किंवा मिरवणुक काढायची असल्यास पोलिसांची पुर्वपरवानगी आवश्‍यक असल्याचे आदेशात म्हटले आहे. हा आदेश चौदा दिवस शनिवार (ता. नऊ) ते ता. २२ नोव्हेंबरच्या रात्री बारापर्यंत लागू राहणार आहे. 

सहा डिसेंबर पर्यंत फटाके विक्री बंद  

निकालाच्या पार्श्वभुमीवर वजिराबाद भागात असलेल्या प्रविण मंत्री यांच्या फटाके विक्री दुकानाला ता. सात ते ता. सहा डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी दिले आहेत. या काळात दुकान चालू ठेवून फटाक्यांची विक्री केल्यास आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने काही अनुचित प्रक्रार घडल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT