sakal
sakal
मराठवाडा

नांदेड : पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला

सकाळ वृत्तसेवा

हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली असून गत काही दिवसापासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने खरिपाची पेरणी संपूर्णतः धोक्यात आली आहे. नगदी पिक असलेले सोयाबीन काढणीच्या प्रतीक्षेत असतानाच पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हिमायतनगर तालुक्यात ३३ हजार ७९० सर्वसाधारण क्षेत्र असून २०२० - २०२१ या अर्थिक वर्षात ३३ हजार ४९० हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक नगदी पिक म्हणजेच सोयाबीन हे पिक १६ हजार १०५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे पांढर सोनं समजले जाणाऱ्या कपाशीची लागवड दुसऱ्या क्रमांकावर करण्यात आली आहे. व तसेच तूर तीन हजार दोनशे पंधरा हेक्टरवर लागवड केली आहे. या भागात सर्वाधिक नगदी पिक सोयाबीनचा पेरा करण्यात आला आहे. या सोयाबीन या नगदी पिकांवर शेतकऱ्यांच्या हातावरील देणे घेणे असते. तसेच शेतकऱ्यांच्या मुलाबाळांची दिवाळी असते.

या वर्षीच्या काळात विक्रमी पाऊस झाला आहे. मधल्या काळातील एक पंधरवाड्याची उघडीप सोडली तर या वर्षी पाऊस सातत्याने या भागात कोसळत आहे. गेल्या आठवडाभरापासून चांगला पाऊस झाला आहे. मात्र, यामुळे खरिपाची पेरणी संपूर्णता धोक्यात आली असून नगदी पिक सोयाबीन हे काढणीच्या प्रतीक्षेत असताना कोसळणारा पाऊस शेतकऱ्यांच्या काळजावर आघात करणारा ठरत आहे. या आठवड्यातील पावसाने तर होत्याचे नव्हते झाले आहे.

तसेच शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनच्या उत्पादनांवर घेतलेले उसने पैसे, परतफेडीची बोली आहे. आता त्यांना काय उत्तर द्यावे?, या विवंचनेत शेतकरी सापडला असून शेतकऱ्यांच्या मुलांबाळाची दिवाळी या वर्षी अंधारातच होणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खासदार, आमदार नुकसानीची पाहणी करून प्रशासनास पंचनामे करण्याचे आदेश देत आहेत. परंतू वस्तूस्थिती अशी आहे की, नुकसान हे सरसकट झाले आहे. त्यामुळेच पंचनाम्याचा फार्स न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची गरज निर्माण झाली आहे.

सोयाबीननंतर कपाशीची अवस्था ही अतिशय बिकट झाली आहे. पहिल्यांदा कपाशीवर इटकर्या रोग त्यानंतर पावसाचा आघात यामुळे शेतकरी या नैसर्गिक संकटाने हतबल झाला आहे. उत्पादनांच्या प्रमुख स्त्रोतातील सोयाबीन व कपाशीची अवस्था अतिशय नाजूक बनली असून शेतकरी संकटात सापडला आहे. या अर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने भरीव स्वरूपाची सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Sachin Tendulkar: सचिनच्या घरातून सिमेंट मिक्सरचा आवाज, शेजाऱ्याच्या तक्रारीनंतर आला फोन कॉल; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT