sucide
sucide 
मराठवाडा

मुली पाठोपाठ पित्याचीही आत्महत्या 

सकाळवृत्तसेवा

बनोटी (जि औरंगाबाद) - एकतर्फी प्रेमातून आळ घेत मारहाण केल्याने अपमानित झालेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली. याचा मोठा धक्का बसलेल्या मुलीच्या पित्याने घटनेनंतर पाचव्या दिवशी गुरुवारी (ता. 14) वाडी-बनोटी (ता. सोयगाव) येथे विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. छोटू गव्हाणे (वय 46) असे मृताचे नाव आहे. 

आठ वर्षांपूर्वी आईचे छत्र हरपल्यानंतर पोरक्‍या झालेल्या दोन मुली, एका मुलाचा पित्याने सांभाळ केला. नियतीच्या खेळात मुलीच्या विरहाने शोकाकुल पित्यानेच मृत्यूला कवटाळल्याने या कुटुंबात आता एक बहीण, एक भाऊ असे दोघेच राहिले आहेत. 

पाच दिवसांपूर्वी दहावीची परीक्षा देत असलेल्या दिव्या गव्हाणे हिच्यावर गावातील एका युवकासह त्याच्या कुटुंबातील पाच जणांनी आळ घेत तिला मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने दिव्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. पिता छोटू गव्हाणे यांना मुलीचा विरह सहन झाला नाही. कधीही दारू न पिणारे छोटू त्या दिवसापासून दारू पिऊन, नशेत तर्रर्र राहू लागले. ते कुणाशीही बोलत नव्हते. नुसते खिन्नपणे पाहत राहायचे. ते गुरुवारी (ता. 14) पहाटे चारला घरातून बाहेर गेले. दुपारपर्यंत घरी न आल्याने नातेवाइकांनी सर्वत्र शोधाशोध केली; पण शोध लागला नाही. वाडी शिवारात छोटू गव्हाणे यांचा पुतण्या जितेंद्र याने शेतात मोटार चालू करून बाजरीला पाणी लावले. पाणी पाहण्यासाठी बाजरीमध्ये गेला असता, शेताच्या मधोमध छोटू यांचा मृतदेह, शेजारी कीटकनाशकाची बाटली आढळली.

ठाणे अंमलदार योगेश झाल्टे, दीपक पाटील, कौतिक सपकाळ यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह बनोटीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविला. डॉ. प्रदीप राजपूत यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. पोलिस पाटील सुनील पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक शेख शकील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शरद रोडगे, सहायक पोलिस निरीक्षक शरद गुंडीले, ठाणे अंमलदार सुभाष पवार, योगेश झाल्टे, दिलीप तडवी, कौतिक सपकाळ, दीपक पाटील करीत आहेत. 
 
आता मागे उरले पोरके बहीण-भाऊ 
आठ वर्षांपूर्वी छोटू गव्हाणे यांच्या पत्नीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर छोटू यांनी आई-वडील अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत मुलांवर मायेची पाखर घातली. गेल्या आठवड्यात या कुटुंबात होत्याचे नव्हते झाले. मुलीच्या आत्महत्येपाठोपाठ पिताही जग सोडून गेला. आता अकरावर्षीय मुलगा रोहित आणि तेरावर्षीय मुलगी सुवर्णा मागे राहिले आहेत. या बहीण-भावाचे पोरकेपण पाहून सर्वजण हेलावले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT