Borewell
Borewell 
मराठवाडा

खोलवर कूपनलिका घेण्याचा सपाटा

सकाळवृत्तसेवा

आष्टी - दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोनशे फुटांपेक्षा अधिक खोल कूपनलिका घेण्यास तहसीलदारांनी निर्बंध घातला असतानाही आष्टी शहरासह तालुक्‍यात तहसीलदारांच्या आदेशाला हरताळ फासत कूपनलिका घेण्याचा सपाटा सुरूच असल्याचे चित्र आहे.

भूजलपातळी खालावण्यास भरमसाट कूपनलिका हेही एक कारण आहे. आष्टी तालुक्‍यात यंदा दुष्काळी परिस्थिती वरचेवर भीषण होत आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार हिरामण झिरवाळ यांनी महिनाभरापूर्वी दोनशे फुटांपेक्षा अधिक खोल कूपनलिका घेण्यास निर्बंध घातले आहेत. शिवाय कूपनलिका घेण्यासाठी संबंधिताने पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे; परंतु आष्टी शहरासह तालुक्‍यात या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. दुष्काळ जाणवू लागल्याने अनेकांनी कूपनलिका घेण्यास सुरवात केली आहे. दोनशे फुटांपेक्षा जास्त खोलवर कूपनलिका सर्रास घेतल्या जात असून, त्यातून आधीच खालावलेली भूजल पातळी अधिकच धोक्‍याकडे जाण्याची शक्‍यता आहे.

सर्वाधिक कूपनलिका बांधकामांसाठी
दुष्काळात बांधकामे वाढल्यास भूजल पातळी खालावते, असा अनुभव आहे. सध्याही सर्वाधिक कूपनलिका या बांधकामांसाठीच घेतल्या जात असल्याचे दिसून येत आहे. शेतीतही कूपनलिका घेण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रशासकीय पातळीवर यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने भविष्यात हे प्रमाण वाढत जाईल, अशी स्थिती आहे.

परप्रांतीय मशीन दाखल
कूपनलिका घेण्यासाठी विशेषतः परप्रांतीयांची मशिनरी व कामगार वर्ग दाखल झाला आहे. तालुक्‍यात प्रतिदिन किमान ३० ते ५० कूपनलिका घेतल्या जात असल्याचा अंदाज आहे. यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास भविष्यात दुष्काळी परिस्थितीत अधिकच भर पडणार आहे.

पाणीटंचाईची निकड लक्षात घेऊन शाळा, महाविद्यालये व धार्मिक ठिकाणीच कूपनलिका घेण्यासाठी रीतसर परवानगी घेतल्यानंतर प्रशासनातर्फे मान्यता देण्याचा विचार आहे. अन्य ठिकाणी कूपनलिकांसाठी निर्बंध घालण्यात आले असून, असे प्रकार सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास अथवा तक्रार प्राप्त झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल.
- हिरामण झिरवाळ, तहसीलदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT