Latur Municipal Coporation, Latur News
Latur Municipal Coporation, Latur News 
मराठवाडा

लातुरातील विकासकामांना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांचा महापालिकेला आदेश

हरि तुगावकर

लातूर : महापालिकेकडून शहरात करण्यात येणाऱ्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतील कामांना जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी स्थगिती दिली आहे. या करीता गेल्या काही दिवसांपासून शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाठपुरावा केला जात होता. याला आता यश आले आहे.


राज्य शासनाच्या वतीने महापालिकेला विविध योजनेतून तसेच १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी मोठ्या प्रमाणात दिला जातो. या निधीच्या माध्यमातून महापालिका शहरातील विविध भागात विकासकामे करत असते. मात्र महापालिकेत या निधीचा अपव्यय होत असून चुकीच्या पध्दतीने पदाधिकारी कामे करत आहेत. सुवर्ण जयंती नगरोत्थान, दलित वस्ती सुधार योजना, १४ व्या वित्त आयोग यासह राज्य शासनाच्या वतीने उपलब्ध होणाऱ्‍या विविध योजनेअंतर्गत विकासकामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात सुरु केली आहे.

मात्र ही कामे बेकायदेशीर असून पदाधिकारी स्वतःच्या राजकीय हितासाठी ही कामे करत आहेत. या कामाना तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी जिल्हाधिकारी व महापालिकेचे आयुक्तांकडे केली होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असून यामुळे मनपाच्या वतीने कोणत्याही कराची ठोस वसुली झालेली नाही. त्यामुळे विद्युत देयकांसह इतर महत्त्वाच्या कामांसाठी १४ व्या वित्त आयोगातील निधी खर्च करणे अपेक्षित आहे.

मात्र याबाबीकडे मनपा सत्ताधारी दुर्लक्ष करीत असून या निधीतून होणाऱ्‍या विकास कामांसाठी खर्च करू नये अशी मागणीही श्री.मगे यांनी केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्‍यांनी महापालिकेतील १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत होणाऱ्‍या विकासकामांना स्थगिती दिली आहे. मात्र या निधीअंतर्गत घनकचऱ्‍याचे संकलन व वाहतूक तसेच त्यावर होणारी प्रक्रिया यासोबत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत करण्यात येणारी स्वच्छतागृहाची कामे, वनीकरण तसेच पाणी पुरवठ्याच्या कामासाठी निधी खर्च करण्यास हरकत नाही, असेही या आदेशात नमूद केले आहे. जिल्हाधिकाऱ्‍यांनी हा स्थगिती आदेश दिल्यामुळे शहर भारतीय जनता पक्षाच्या पाठपुराव्याला यश आलेले असून महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या मनमानीला चाप बसला आहे, अशी प्रतिक्रिया श्री. मगे यांनी व्यक्त केली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT