jcb.jpg
jcb.jpg 
मराठवाडा

वाळू माफियांचा नांदेड जिल्ह्यात हैदोस 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड तालुक्यातील गंगाबेट घाटावर अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महसुलच्या पथकावर कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवत चक्क प्राणघातक हल्ला केला. तलाठी पठाण आणि वांगीकर यांच्या अंगावर जेसीबी घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना शनिवारी (ता. 6) घडली. या प्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड जिल्ह्यातील वाळू मफियांची मनमानी अनेकांना त्रासदायक ठरत आहे. विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या तरीसुध्दा वाळूची अवैध वाहतुक जोमाने सुरू आहे. नांदेड तालुक्यातील अनेक वाळू घाटावर जेसीबीच्या आधारे वाळू उसा सुरू आहे. या प्रकरणाची दखल नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकित पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी घेतली. त्यांनी तहसिलदार व आयुक्त यांना धारेवर धरले होते. 

महसुलची कानउघाडणी केल्यानंतर नांदेड तहसिलचे एक पथक गंगाबेट (ता. नांदेड) येथे सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेले. नायब तहसिलदार मुगाजी काकडे हे तलाठी मोहसीन पठाण, मंगेश वांगीकर यांच्यासह अन्य कर्मचारी घेऊन घाटावर पोहचले. यावेळी या पथकांनी वाळू वाहतुक करणारे हायवा ट्रक जप्त केले. जेसीबी जप्त करण्यापूर्वी चालकाने भरधाव वेगात घटनास्थाळवरून जेसीबीसहपळ काढला. तलाठी पाठलाग करीत असतांना त्यांच्यावर जेसीबी टाकून मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुगाजी काकडे यांच्या फिर्यादीवरुन जेसीबी चालक आणि मालक तुकाराम कदम (रा. शेलगाव ता. लोहा) या दोघांवर प्राणघातक हल्ला, शासकिय कामात अडथळा यासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश थोरात हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT