Police Watch On Citizens, Latur
Police Watch On Citizens, Latur  
मराठवाडा

बाहेर पडणाऱ्यांवर आता ‘ड्रोन’ची नजर, लातूर पोलिसांचा पुढाकार

सुशांत सांगवे

लातूर : कोरोना साथीला अटकाव घालण्यासाठी घराबाहेर पडू नका, असे आवाहन करूनही वारंवार घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे लातूर पोलिसांनी आता ड्रोनची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रोन शहरातील रस्त्यांवर फिरवून या माध्यमातून बाहेर फिरणाऱ्यांची छायाचित्रे काढली जाणार आहेत. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या निर्णयामुळे आता विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.


‘कोरोना’ला आळा घालण्यासाठी घराबाहेर पडू नका, असे आवाहन सरकार, आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलिसांकडून केले आहे; पण काहींना याचे गांभीर्य नसल्याने ते अजूनही घराबाहेर पडताना दिसत आहेत. म्हणून पोलिसांनी सुरवातीला काठीने बाहेर पडणाऱ्यांना चोप द्यायला सुरवात केली; पण हातातील काठी खाली ठेवल्यानंतर रस्त्यावरील गर्दी पुन्हा वाढू लागली. त्यामुळे पोलिसांनी दुचाकी, चारचाकी वाहने जप्त करायला सुरवात केली आहे. याबरोबरच सकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जात आहेत.

त्यातच आता ड्रोनच्या माध्यमातून बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, याबाबतची माहिती पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी ट्विटरवरून बुधवारी (ता. एक) जाहीर केली. ते म्हणाले, की कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून पोलिस अधिकारी-कर्मचारी रात्रंदिवस रस्त्यावर आहेत. ते नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटत आहेत. पोलिस, आरोग्य यंत्रणेच्या सहकार्याने आपल्याला ‘कोरोना’ची साखळी तोडता येईल. म्हणून लातूर पोलिसांकडून आता ड्रोनचा वापर केला जात आहे. जर कोणी संचारबंदीचे उल्लंघन करताना दिसून आले तर त्यांचे छायाचित्र काढून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जातील. म्हणून संचारबंदीचे सर्वांनी कसोशीने पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. सामाजिक अंतर ठेवावे. यामुळेच कोरोना विषाणूपासून दूर राहू शकतो.


पोलिसांनीही घ्यावी दक्षता
रस्त्यावरील गर्दी कमी व्हावी म्हणून पोलिस प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक डॉ.राजेंद्र माने यांनी पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. माने म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व पोलिस अधिकारी-कर्मचारी अत्यंत सचोटीने रात्रंदिवस काम करत आहेत. अशा स्थितीत पोलिसांनीही स्वत:ची आणि स्वत:च्या कुटूंबियांची काळजी घेणे हेही तितकेच गरजेचे आहे. पोलिसांनी कोणाशीही बोलताना किमान तीन फुट अंतर ठेऊन बोलावे. चेहऱ्याला मास्क बांधावा. वारंवार हात धुवावे. सॅनिटायझरचा वापर करावे. नागरिकांनीही विनाकरण घराबाहेर पडणे टाळावे. संचारबंदीच्या काळात काही अडचणी असतील, कुठल्याही प्रकारची मदत नागरिकांना हवी असेल तर त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षातील १०० क्रमांकावर किंवा ८०८७०००९०१, ०२, ०३, ०४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.

पोलिस हे नागरिकांच्या भल्यासाठी, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठीच प्रयत्न करीत आहेत. विनाकारण घराबाहेर पडून पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्यास, बळाचा वापर करण्यास उद्युक्त करू नका.
- सचिन सांगळे, पोलिस उपअधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT