shekap
shekap 
मराठवाडा

शेकापतर्फे बीडमध्ये मराठवाडा दुष्काळ परिषदेचे आयोजन 

सुषेन जाधव

औरंगाबाद : प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही. त्यामुळे आता चारा छावणीला नाही तर दावणीला द्या यासह अन्य महत्त्वाच्या धोरणांवर चर्चात्मक तसेच शासनाकडे विविध मागण्या करणारी भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे (शेकाप) मराठवाडा दुष्काळ परिषद येत्या 31 जानेवारी 2019 रोजी बीड येथे होणार आहे. अशी माहिती शेकापचे विभागीय चिटणीस भाई काका शिंदे यांनी मंगळवारी (ता. 29) पत्रकार परिषदेत दिली. 

या परिषदेला शेकापचे ज्येष्ट नेते भाई गणपतराव देशमुख वयाच्या 93 व्या वर्षी उपस्थित राहून मत धोरण जाहीर करणार आहेत. दरम्यान सरचिटणीस जयंत पाटील, चिटणीस प्रवीण गायकवाड यांच्यासह शेकापचे सर्व आमदार, पदाधिकारी यांची उपस्थिती असेल. परिषदेत तूर, मकासह इतर शेतमालांना भावांतर योजनेंतर्गत थकीत अनूदान मिळावे तसेच संपूर्ण कर्जमाफी ही सरकारची घोषणा फसवी निघाल्याने दररोज पाच ते सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत हे रोखण्यासाठी सरकारने तात्काळ विनानिकष सरसकट कर्जमाफी करावी, रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सुरु करावी, ऊस पट्ट्यात तात्काळ बियाण्याचे वाटप करुन आठ तास वीज द्यावी आदि महत्त्वाच्या मागण्या करण्यात येणार आहेत. पत्रकार परिषदेला शेकापचे जिल्हा प्रवक्ता महेश गुजर, प्रवीण खिल्लारे यांची उपस्थिती होती.

शेकापला मराठवाड्यातून सहा जागा 
शेतकरी कामगार पक्ष मराठवाड्यातून येत्या विधानसभेला सहा जागा लढविणार आहे. त्यासंदर्भातही पक्षांच्या श्रेष्टींसोबत बोलणी झाली असून निवडणूक लढण्याची तयारी झाली झाल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र कोण कोण लढणार याविषयी विचारणा केली असता, स्वतःचे नाव सांगत उर्वरित नावे जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

SCROLL FOR NEXT