earthquake
earthquake 
मराठवाडा

हिंगोली : पांगरा शिंदे परिसरात 2 रिश्टर स्केल भूकंप

मंगेश शेवाळकर

हिंगोली : पांगरा शिंदे (ता.वसमत) येथे गुरुवारी (ता. 13) सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी भूकंप झाला असून या भूकंपाची दोन रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे. त्यामुळे या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे भागात मागील काही दिवसांपासून जमीनीतून गुढ आवाज येऊ लागले आहेत. या आवाजामुळे पांगरा शिंदे व पसिरतील गावकरी देखील भयभीत आहेत. अचानक मोठा आवाज होऊन काही सेकंद जमीन हालत असल्याचे जाणवत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र या गुढ आवाजाचे गुढ मात्र कायम आहे.

दरम्यान, मागील पंधरवड्यात पांगराशिंदे या गावात तीन ते चार वेळा भुगर्भातून गुढ आवाज आले आहेत. मात्र त्याची लातुर येथील भुकंप मापक केंद्रात नोंद झाली नाही. त्यामुळे भुकंप की गुढ आवाज याबाबत संभ्रम कायम होता. त्यानंतर आज सकाळी नऊ वाजून एकोणवीस मिनीटांनी पुन्हा मोठा आवाज झाला. मात्र या आवाजाची लातुर येथे नोंद झाली असून दोन रिश्टरस्केलचा हा भुकंप असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या भागात सौम्य भुकंपाचा धक्का बसल्याचे लक्षात आल्यानंतर आता गावकरी चांगलेच सावध झाले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे व दिल्ली येथील मास्टर ट्रेनर यांच्या मार्फत गावांमधे कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. यामधे गावकऱ्यांना भुकंपासारखी नैसर्गिक आपत्ती आल्यास काय केले पाहिजे याची माहिती दिली जाणार आहे. 

या गावांमधे घेतल्या जाणार कार्यशाळा
पांगरा शिंदे येथे भुकंपाची नोंद झाल्यानंतर प्रशासनाने आता कार्यशाळेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यामधे पांगरा शिंदे, कुपटी, वापटी, शिरळी, राजवाडी तर औंढा तालुक्यातील आमदारी, राजदरी, टेंभूरदरा, सोनवाडी, जामगव्हाण, पिंपळदरी तसेच कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव, सालेगाव, असोला, बोल्डा, बोल्डावाडी,  नांदापूर या गावांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT