Sunil Rodge Died In Electric Shock
Sunil Rodge Died In Electric Shock 
मराठवाडा

शेतात पाणी देताना विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, कुटुंबावर कोसळले दुःखाचे डोंगर

युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : देवर्जन (ता.उदगीर) येथे विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता.नऊ) सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की देवर्जन येथील युवक शेतकरी सुनील गंगाधर रोडगे (वय-२५) हा शेतीला पाणी देण्यासाठी  देवर्जन मध्यम प्रकल्पालगत असलेली मोटार चालू करण्यासाठी गेला होता. मोटार चालू करत असताना त्या शॉक लागला अन् तो पाण्यात फेकला गेला.


त्यास तातडीने उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एक उमदा तरुण शेतकरी, अतिशय मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व, मित्र कंपनीत आवडता असणाऱ्या या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने देवर्जन गावावर शोककळा पसरली आहे.

येथील सामान्य रुग्णालयात त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो ग्रामीण पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती दवाखान्याचे पोलिस कर्मचारी सिकंदर शेख यांनी दिली आहे.

शासकीय मदत हवी

देवर्जन येथील एका सामान्य कुटुंबातील युवक शेतकरी असून त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील व मुले असा परिवार आहे. या परिवारावर आता दुःखाचा डोंगर कोसळला असून या परिवारास तातडीची शासनाची मदत मिळावी, अशी मागणी देवरायांच्या ग्रामस्थांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT