fake currency
fake currency  
मराठवाडा

घरातच सुरु होता बनावट नोटांचा कारखाना 

मनोज साखरे

औरंगाबाद- औरंगाबादेतील नेहरुनगर येथील एका घरात बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. याच नोटा बाजारात दोन रिक्षाचालक खपवित होते. त्यांच्यासह नोटा तयार करणाऱ्याला पुंडलिकनगर पोलिसांनी गुरुवारी ता. 31, रात्री बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून साडेनऊ हजारांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सय्यद सैफ सय्यद असद (वय 24, रा. नेहरुनगर, कटकटगेट), सय्यद सलीम सय्यद मोहम्मद (वय 22, रा. कृष्णनगर, रांजणगाव, मुळ उत्तरप्ररदेश) अशी संशयितांची नावे आहेत. ते रिक्षाचालक असुन बाजारात नोटा खपवित असल्याच्या संशयावरुन त्यांना अटक झाली. ते शंभर रुपयांच्या बनावट नोटा खपवित असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी सेव्हनहिल येथील जागृती पंपामागील उद्यानात सापळा रचला.

त्यावेळी नंतर सय्यद सैफ व सय्यद सलीम यांना पोलिसांनी पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे शंभर रुपयांच्या पंच्यान्नव बनावट नोटा सापडल्या. दोघांकडून बनावट साडे नऊ हजार जप्त करुन त्यांची चौकशी पोलिसांनी केली. त्यावेळी या नोटा 
शेख समरान उर्फ लक्की रशिद शेख याच्याकडून आणल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी शेख समरान याला पकडले. त्याच्या घराची झडती घेऊन पोलिसांनी प्रिंटर, कटर, मोजपट्टी, हिरव्या रंगाची रेडीयम टेप, शाई व कागद, खऱ्या चार नोटांसह मोबाईल जप्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT