मराठवाडा

विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

बनोटी (जि.औरंगाबाद) ः अतिवृष्टी, नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून पहुरी (ता.सोयगाव) येथील तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.31) उघडकीस आली. ज्ञानेश्वर माधवराव साबळे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पहुरी येथील शेतकरी माधवराव साबळे यांच्याकडे पहुरी शिवारात दोन एकर शेती असून दोन तरुण मुले शेती करतात. तीन वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळामुळे शेतीसाठी लागलेला खर्च देखील निघत नसल्याने कुटुंबाचा खर्च कसा करावा या चिंतेत संपूर्ण कुटुंब असताना ज्येष्ठ मुलगा ज्ञानेश्वर साबळे याने सिंदाळ (ता.पाचोरा) येथे नऊ एकर शेती बटाईवर करण्याचा निर्णय घेतला. शेतीसाठी लागणारा खर्च करण्यासाठी गोंदेगाव येथील बॅंकेतून कर्ज घेऊन सिंदाळ येथे शेती करू लागला.

पीकही जोमात होते. मात्र गेल्या पंधरवड्यापासून परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने ज्ञानेश्वरला नैराश्‍य आले होते. कुणाशीही काही बोलत नव्हता. सोमवारी (ता.28) घरात कुणालाही न सांगता घरून निघून गेला तसा परतलाच नसल्याने कुटुंब, नातेवाईक दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. गुरुवारी (ता.31) सकाळी भाऊ कृष्णा साबळे शोध घेत असता सिंदाळ (ता.पाचोरा) गवना शिवारातील गट क्रमांक 466 मधील संजय यादव यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती मिळाल्यावर येथे गेला असता मृतदेह ज्ञानेश्वरचा असल्याचा निष्पन्न झाले. पिंपळगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. बनोटी मंडळात पाऊस आणि तीन झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तीन दिवसांत तीन शेतकऱ्यांनी जीवन संपविल्याची घटना बनोटी परिसरात घडल्या आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT